Whatsapp yandex
बिझनेस

Whatsapp: नववर्षाला धक्का! जुने स्मार्टफोन युजर्सना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही, नवीन फोनची गरज

Whatsapp Old Users: अनेक जुन्या स्मार्टफोनसाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा सपोर्ट बंद करण्यात आला आहे आणि आता हे वापरकर्ते त्यांच्या फोनवर चॅट करू शकणार नाहीत.

Dhanshri Shintre

नववर्षाच्या सुरुवातीला, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) काही जुन्या स्मार्टफोनसाठी अॅप सपोर्ट बंद करत आहे. यामुळे अशा स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल. नवीन मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी WhatsApp ने जुन्या उपकरणांवरील समर्थन समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात सुमारे दोन अब्ज वापरकर्त्यांसह लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सॲपचा भारतात मोठा वापरकर्ता वर्ग आहे. १ जानेवारी २०२५ पासून, २० हून अधिक Android फोनसाठी व्हॉट्सअॅप समर्थन समाप्त होत आहे. याचे कारण या फोनमध्ये जुन्या Android ४.४ Kitkat किंवा त्यापेक्षा जुन्या सॉफ्टवेअर आवृत्त्या आहेत, ज्यामुळे वापरकर्ते चॅटिंग करू शकणार नाहीत.

HDblog च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने (Meta) अनेक जुन्या उपकरणांसाठी ॲप समर्थन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील उद्देश इतर वापरकर्त्यांना अधिक चांगली सुरक्षा आणि कार्यक्षमता प्रदान करणे आहे. समर्थन संपलेल्या उपकरणांची यादी पाहिली तर लक्षात येते की हे फोन एक दशकापूर्वी लॉन्च झाले होते.

त्यामुळे अशा उपकरणांना दीर्घ काळापासून कोणतेही सॉफ्टवेअर अद्यतने मिळालेली नाहीत. नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी Meta ने हा निर्णय घेतला आहे. जुने फोन वापरणाऱ्यांना यामुळे व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन स्मार्टफोन घेण्याची आवश्यकता भासणार आहे.

पाहा कोणच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही

Samsung

Galaxy S3

Galaxy Note 2

Galaxy Ace 3

Galaxy S4 Mini

Motorola

Moto G (1st Gen)

Motorola Razr HD

Moto E 2014

HTC

One X

One X+

Desire 500

Desire 601

LG

Optimus G

Nexus 4

G2 Mini

L90

Sony

Xperia Z

Xperia SP

Xperia T

Xperia V

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hadapsar Terminal: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू?

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

SCROLL FOR NEXT