TVS Apache Black Dark Edition Saam Tv
बिझनेस

TVS Apache चा नवीन Black Dark Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Satish Kengar

TVS Apache Black Dark Edition:

बाईक प्रेमींसाठी प्रसिद्ध वाढणं उत्पादक कंपनी TVS मोटरने भारतात आपल्या लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Apache RTR 160 चे नवीन ब्लेझ ब्लॅक डार्क एडिशन लॉन्च केला आहे. कंपनीने नवीन RTR 160 4V ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये ठेवली आहे. तसेच RTR 160 ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच बाईकच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

इंजिन

नवीन Apache RTR 4V 160 ब्लॅक डार्क एडिशनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात तेच इंजिन आहे जे याच्या सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 159.7 cc इंजिन आहे, जे 17.6PS पॉवर आणि 14.73Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. 160cc सेगमेंटमध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व बाइक्सपैकी नवीन RTR 4V 160 बाईकमध्ये सर्वाधिक पॉवर आहे, असा कंपनीचा दावा आहे.

फीचर्स

ब्लॅक पेंट स्कीम आणि लोगो व्यतिरिक्त, TVS Apache RTR 160 4V ब्लॅक एडिशनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल दिसत नाहीत. बाईकचा बॉडी पेंट ग्लॉसी ब्लॅक आहे. ही बाईक ब्लॅक रंगात अतिशय आकर्षक दिसते. बॉडी टँक अधिक बोल्ड दिसते.

बाईकमध्ये एक डिजिटल स्पीडोमीटर आहे. यामध्ये तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लो फ्युएल वॉर्निंग, लीन अँगल मोड, क्रॅश अलर्ट आणि कॉल/एसएमएस यासारखे फीचर्स मिळतील.

चांगल्या ब्रेकिंगसाठी बाईकमध्ये 270mm पेटल डिस्क ब्रेकची सुविधा आहे. यासोबतच ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यांचे दोन्ही टायर 17 इंच आकाराचे आहेत. या बाईकचे एकूण कर्ब वजन 139 किलो आहे. याची टॉप स्पीड 107kmph आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT