Rule Change Google
बिझनेस

Rule Change: आधार कार्ड ते क्रेडिट कार्डच्या या ९ नियमांमध्ये होणार सप्टेंबर महिन्यापासून बदल;जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

सप्टेंबर महिन्यापांसून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. आधार कार्ड ते अगदी गॅस सिलेंडरपर्यंच सर्व नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोणत्याही प्रकारचा खर्च करताना तुम्ही या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सप्टेंबप महिन्यात बदलणाऱ्या ९ नियमांची माहिती जाणून घ्या.

आधार कार्ड अपडेट

आधार कार्ड अपडेट करण्याची मूदत वाढली आहे. आता तुम्ही १४ सप्टेंबर २०२४पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ होती. मात्र, आता ही तारीख ३ महिन्यांनी वाढवली आहे.

IDFC बँक क्रेडिट कार्ड नियम

IDFC बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड पेमेंटच्या नियमांमध्ये बदल केले आहे. यात आता नवीन पेमेंट अमाउंट आणि पेमेंटच्या वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन नियम सप्टेंबर महिन्यांपासून लागू होणार आहे.

HDFC Bank क्रेडिट कार्डचे नियम

HDFC बँकेने क्रेडिट कार्डच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये काही बदल केले आहेत. बँक याबाबत सर्व माहिती ग्राहकांना ई-मेलद्वारे देणार आहे.

IDBI बँक एफडी डेडलाइन

IDBI बँकेने उत्सव स्पेशन एफडीचा कालावधी वाढवला आहे. एफडीची वॅलिडिटीची तारीख आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यात ३०० दिवस, ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांच्या एफडीचा समावेश आहे. याचसोबत ७०० दिवसांच्या नवीन एफडीचा समावेश आहे.

इंडियन बँक एफडी डेडलाइन

इंडियन बँकेने ३०० दिवसांच्या एफडीवर व्याजदर ७.०५ टक्के निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत सुपर सिनियर नागरिकांना व्याजदर ७.८० टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे.

पंजाब आणि सिंध बँक एफडी डेडलाइन

पंजाब आणि संध बँकेच्या २२२ दिवसांच्या एफडीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आता या योजनेत गुंतवणूकीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ करण्यात आली आहे.

SBI अमृत कलश

SBI अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर मिळते.

Rupay Card रिवार्ड पॉइंट्स

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन निर्देश दिले आहे. याअंतर्गत रुपये क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यव्हारांची फी रिवॉर्ड पॉइंट्स किंवा इतर लाभांमधून कापणार नाही. हे नियम १ सप्टेंबर २०२४ पासून लागू होमार आहे.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

आरबीआयने क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये कार्ड नेटवर्कसोबत तुम्ही इतर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टवर सही करु नये. यामुळे इतर नेटवर्क युजर्संना क्रेडिट कार्डचा वापर करण्यापासून थांबवू शकतात. हे नियम ६ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT