New Labour Code Saam Tv
बिझनेस

New Labour Code: ८ दिवसात तुमच्या पगाराचे गणित बदलणार; नवीन कामगार कायद्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार?

New Labour Law From 1st April 2026: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या आर्थिक वर्षात नवीन कामगार संहिता लागू केली जाणार आहे. यामध्ये सॅलरी स्ट्रक्चरवर परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून नवीन कामगार संहिता लागू

कर्मचाऱ्यांचं सॅलरी स्ट्रक्चर बदलणार

थेट तुमच्या पगारावर होणार परिणाम

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. १ एप्रिल २०२६ पासून पैशांसंबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा आणि नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. यामुळे कराचे नियम आणि सॅलरी स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहे. या नवीन नियमांमुळे सॅलरी स्टॅक्चर, इन हँड सॅलरी आणि रिटायरमेंट फंडवर परिणाम होणार आहे.

नवीन कामगार संहिता काय आहे? (What is New Labour Code)

नवीन लेबर कोडमधील बदल बेसिक सॅलरीबाबत आहे. यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा सीटीसीच्या निम्मा असायलाच हवा. सध्या कंपन्या बेसिक सॅलरी कमी ठेवतात आणि एचआरए, ट्रॅव्हल अलाउन्स, स्पेशल अलाउन्स असे भत्ते वाढवतात. दरम्यान, आता या नवीन नियमांनुसार सर्व भत्ते पगाराच्या ५० टक्के पेक्षा कमी ठेवले जाणार नाही. त्यामुळे मूळ पगार हा सीटीसीपेक्षा अर्धा किंवा जास्त असेल.

टेक होम सॅलरीवर परिणाम

मूळ पगार वाढल्याने थेट तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होणार आहे. पीएफ आणि ग्रच्युटी मूळ पगारावर मोजली जाते. मूळ पगार वाढल्यावर पीएफ योगदानदेखील वाढेल. यामुळे पीएफ जास्त कापला गेला तर हातात कमी पगार येऊ शकतो. परंतु याचा फायदा असा की, तुमच्या पीएफ खात्यात जास्त पैसे जमा होतील.

इन्कम टॅक्सवर परिणाम

पगार रचनेत बदल झाल्यावर टॅक्समध्येही बदल होऊ शकतो. ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी कर प्रणाली निवडली आहे. त्यांना एचआरएवर मिळणारी सवलत कमी होऊ शकते. एचआरए मूळ पगाराच्या १० टक्के आधारावर ठरवला जातो. तर नवीन करप्रणालीअंतर्गत १२.७५ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Rain Update : राज्यात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

Maharashtra News Live Update: परभणीत भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

भाजपचा सुपडासाफ, 'आप'ची गाडी सुसाट; 500 जागांवर विजय, काँग्रेसला किती जागा मिळाल्या?

Kandhar Fort: नांदेडच्या कंधार किल्ल्याभोवतीच्या १०० फूट रूंद आणि खोल खंदकातील पाणी कडक उन्हातही का आटत नाही?

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: बॉलीवूडमध्ये खळबळ! 'या' जुन्या गाण्यावरून तब्बल ४०० कोटींचा कोर्ट खटला; धवन कुटुंबही अडचणीत?

SCROLL FOR NEXT