New Labour Law Saam Tv
बिझनेस

New Labour Law: कामावरुन काढून टाकल्यावर मिळणार १५ दिवसांचा पगार; कामगार कायद्यात नवीन बदल

New Labour Law 2025: कर्मचाऱ्यांसाठी नवीन कामगार कायदे लागू केले जाणार आहे. आता कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर १५ दिवसांची सॅलरी मिळणार आहे. याचसोबत ४५ दिवसांच्या आता ऑटो सेटलमेंट केली जाणार आहे.

Siddhi Hande

नवीन कामगार कायदा

कंपनीने कामावरुन काढून टाकल्यास मिळणार १५ दिवसांची सॅलरी

नोकरी गेल्यानंतरही मिळणार उत्पन्नाची हमी

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांनी नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. आता नोकरी गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांना १५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. नोकरी गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अनिश्चितता, मानसिक ताण येतो. परंतु आता कर्मचाऱ्यांना या काळजी करण्याची गरज नाही. आता ही परिस्थिती बदलणार आहे. आता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी २१ नोव्हेंबर २०२५ पासून कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे नोकरी गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळणार आहे.

नवीन प्रणालीत काय असते? (New Labour Law)

नवीन कामगार संहितेनुसार, कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना दोन प्रकारची भरपाई मिळणार आहे. अनिवार्य भरपाई आणि १५ दिवसांचे वेतन मिळणार आहे. याचसोबत हे पैसे ४५ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे.ही तरतूद औद्योगिक संबंध संहिता २०२० चा भाग आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्यास आणि रोजगार शोधण्यास प्रोत्साहन मिळेल.

नवीन नियमांनुसार, जर कर्मचाऱ्यांची काही चुक असेल किंवा बेशिस्त वागणूकीशिवाय किंवा एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकणे, या परिस्थितीत हा नियम लागू असेल. कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीमध्ये हा नियम लागू होणार नाही.

कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार?

अचानक नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर आर्थिक ताण येतो. यामुळे जर १५ दिवसांची सॅलरी दिली तर कर्मचाऱ्यांना सुरुवातीला अडचणी येणार नाही. कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यासाठी वेळ मिळतो. या कालावधीत ते पुन्हा एकदा नवीन कौशल्य शिकू शकतात. कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. अंतिम सेटलमेंटमध्येही वेळ लागणार नाही. ४५ दिवसांत अंतिम सेटलमेंट करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय सेनेचा जवान शहीद

Marathi Movie: एक एन्ट्री… आणि सगळं बिघडलं! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हास्यासोबत सस्पेन्सचा तडका

Panipuri Ragda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत पाणीपुरी रगडा, सोपी आहे रेसिपी

खळबळजनक! दिवसाढवळ्या एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

SCROLL FOR NEXT