New Kia Seltos HTK+ launched in India Saam Tv
बिझनेस

नवीन Kia Seltos भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह दमदार आहेत फीचर्स; Hyundai Creta ला देणार टक्कर

Kia Seltos 2024: आघाडीची कार उत्पादक कंपनी Kia India ने आपली नवीन कार SUV Seltos चा HTK+ व्हॅरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन व्हॅरिएंटमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

Satish Kengar

New Kia Seltos HTK+ launched in India:

आघाडीची कार उत्पादक कंपनी Kia India ने आपली नवीन कार SUV Seltos चा HTK+ व्हॅरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन व्हॅरिएंटमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

Kia Seltos ची भारतात Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, Skoda Kushaq, Honda Elevate, MG Astor आणि Citroen C3 Air cross या कारशी थेट स्पर्धा होईल. याच कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किंमत आणि फीचर्स

नवीन Kia Seltos HTK+ पेट्रोल IVT आणि डिझेल AT व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत अनुक्रमे 15.4 लाख आणि 16.9 लाख रुपये आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या नवीन व्हेरियंटमध्ये ड्युअल पॅनोरामिक सनरूफ, ड्राइव्ह अँड ट्रॅक्शन कंट्रोल, पॅडल शिफ्ट एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प, ड्युअल झोन ऑटोमॅटिक एसी आणि 10.25 इंच ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

या कारमध्ये 6 एअरबॅग्ज आणि 3 पॉइंट सीट बेल्ट, अँटी-लॉकब्रेक सिस्टम, ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टम आणि ऑल व्हील डिस्क सारखे सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहे. याशिवाय ADAS 2.0 सह सुसज्ज नवीन Seltos 17 Adaptive Driver Assistance System ने सुसज्ज आहे.

इंजिन

नवीन HTK+ व्हेरियंट व्यतिरिक्त Kia Seltos च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्मार्ट स्ट्रीम G1.5 6MT आणि 1.5l CRDi VGT 6MT इंजिन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय देखील आहेत. सेल्टोसची दोन्ही इंजिने जबरदस्त पॉवर देतात. याशिवाय ग्राहकांना यामध्ये चांगले मायलेजही मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT