Xiaomi SU7 EV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये गाठते! अवघ्या 27 मिनिटांत 50,000 EV झाल्या बुक; जाणून घ्या किंमत

Electric Car: अलीकडेच Xiaomi ने चीनमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान कार ‘SU7’ लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 215,900 युआन (जवळपास 24.92 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.
Xiaomi SU7 EV Bookings
Xiaomi SU7 EV BookingsSaam Tv

Xiaomi SU7 EV Bookings:

अलीकडेच Xiaomi ने चीनमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान कार ‘SU7’ लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 215,900 युआन (जवळपास 24.92 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ही कार काही 3 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही कार चीनसह एकूण 29 देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होणार आहे.

सध्या ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. या कारला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या कारची 50 हजारांहून अधिक बुकिंग झाली आहे. Xiaomi SU7 चे डिझाइन खूप प्रीमियम आहे. ही कार दिसायला खूपच आकर्षक आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Xiaomi SU7 EV Bookings
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून बदलणार 'हा' विशेष नियम

27 मिनिटांत 50,000 बुकिंगचा आकडा पार

एका रिपोर्ट्सनुसार, Xiaomi SU7 EV ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 27 मिनिटांत याला 50 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. इतकेच नाही तर या कारने लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 4 मिनिटांत 10 हजार बुकिंगचा विक्रमही केला आहे. Xiaomi SU7 ची किंमत Tesla Model 3 पेक्षा कमी आहे आणि याची रेंज जास्त आहे. या व्यतिरिक्त ही कार BYD शी देखील स्पर्धा करेल.  (Latest Marathi News)

मिळेल जबरदस्त रेंज

Xiaomi SU7 दोन बॅटरी पॅकसह येते. यात 73.6kWh आणि 101kWh चा बॅटरी पॅक आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार अनुक्रमे 700 किलोमीटर आणि 810 किलोमीटरची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनी आगामी काळात 150kWh बॅटरी पॅकसह ही कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. जी एका चार्जमध्ये 1200 किलोमीटरची रेंज देईल.

Xiaomi SU7 EV Bookings
Upcoming Bikes: 125cc सेगमेंटमध्ये बजाज घेऊन येणार जबरदस्त बाईक, लॉन्चआधी फोटो झाला लीक; जाणून संपूर्ण माहिती

ही इलेक्ट्रिक कार अल्ट्रा फास्ट चार्जिंगसह उपलब्ध असेल. Xiaomi चा दावा आहे की, ही कार फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर 350km ची रेंज देईल. ही कार 5.28 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. Xiaomi SU7 ची डिझाइन टेस्ला आणि पोर्श सारखी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com