New Income Tax Act Saam Tv
बिझनेस

New Income Tax Act: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षात लागू होणार नवा प्राप्तिकर कायदा

New Income Tax Act 2025: केंद्र सरकार लवकरच नवीन प्राप्तिकर कायदा लागू करणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे. यामुळे करदात्यांना आयटीआर फॉर्म समजणे सोपे होणार आहे.

Siddhi Hande

इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल होणार

नवीन प्राप्तिकर कायदा होणार लागू

आयटीआर फॉर्म भरणे होणार अधिक सोपे

१ एप्रिल २०२६ पासून होणार लागू

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख रवि अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आयकर विभाग जानेवारीपर्यंत नवीन इन्कम टॅक्स कायदा २०२५ अंतर्गत आयटीआर फॉर्म आणि त्याच्या नियमांबाबत माहिती देणार आहे. हा नवीन कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

आयटीआर फॉर्म भरणे अधिक सोपे व्हावे, या उद्देशाने हा नवीन नियम लागू केला जाणार आहे. जवळपास ६० वर्षे जुना १९६१ च्या कायद्याच्या जागी हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे.

फॉर्म आणि नियमांमध्ये बदल

प्राप्तिकर कायदा २०२५ हा १२ ऑगस्ट रोजी मंजुर करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत सर्व आयटीआर फॉर्म, टीडीएस पुन्हा तयार केले जाणार आहे. करदात्यांसाठी फॉर्म सोपे व्हावे यासाठी डायरेक्टरेट ऑफ सिस्टीम टॅक्स पॉलिसी डिवीजनसोबत काम करत आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे छाननी केल्यानंतरच नवीन नियम अधिसूचित केले जातील आणि संसदेत मांडले जातील. प्राप्तिकर कायदा २०२५ हा पुढील आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये लागू होईल. १ एप्रिल २०२६ पासून हा नियम लागू केला जाणार आहे.

नवीन कायद्यामुळे फायदे (New Income Tax Act 2025 Benefits)

या नवीन प्राप्तिकर कायद्यामुळे कर कायदे समजणे सोपे होईल. एकदम सोप्या शब्दात हे कायदे समजावले जातील. नवीन कायद्यात कोणतेही कर दर आणले जाणार नाहीत.यामध्ये फक्त भाषा सोपी केली जाणार आहे. यामध्ये कायद्यातील अनावश्यक तरतुदी आणि जुनी भाषा काढून टाकली जाणार आहे. हा नवीन कायदा ८१९ वरुन ५३६ पानांचा केला आहे. तसेच प्रकरणांची संख्या ४७ वरुन २३ केली आहे. नवीन कायद्यात शब्दांची संख्या ५.१२ लाखांवरुन २.६ लाख केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अजित पवार समर्थकांमध्ये दगडफेक|VIDEO

Maharashtra Live News Update: सोळा वर्षीय भाचीला मामाने ट्रेनमधून ढकललं; अल्पवयीन भाचीचा मृत्यू

Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Politics : राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी; महायुतीत भूकंप

भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले

SCROLL FOR NEXT