केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचसोबत अनेक राज्य सरकारनेदेखील या योजना राबवल्या आहेत. दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास नीव योजना लाँच केली आहे. या योजनेत त्यांना सरकारकडून २० हजार रुपये मिळणार आहे. फक्त सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दिल्ली सरकारने मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत काही प्रोजेक्टवर काम करण्यासाठी २० हजार रुपयांची मदत केली जाते.
काय आहे NEEEV योजना? (What Is NEEV Scheme For Students)
दिल्लीतील या योजनेचं नाव न्यू एरा ऑफ इंटरप्रिन्यूरियल इकोसिस्टम अँज व्हिजन (NEEEV) असं आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. विद्यार्थ्यांना नवीन विचार, समस्या सोडवण्यासाठी आणि स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत ८वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. ही योजना फक्त शिक्षणासाठी नाही तर बिझनेस कसा करायचा हेदेखील शिकवणार आहे.
NEEEV योजनेची खासियत
NEEEV या योजनेत विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे. शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळेत या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेसाठी प्रत्येक शाळेत एक NEEEV स्कूल प्रोग्राम कोऑर्डिनेटर निवडणार आहे. हे लोक शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहे.
१. NEEEV डायलॉग
यामध्ये उद्योगविश्वातील विविध लोक आणि बिझनेसमॅन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यामधून त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळणार आहे.
२. स्टार्टअप स्टॉर्मर्स
यामध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी नवनवीन बिझनेस आयडिया एकमेकांना सांगणार आणि त्यावर काम करणार
३. फंड
ज्या विद्यार्थ्यांच्या समूहाला निवडले जाईल. त्यांना आपली आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि बिझनेस सुरु करण्यासाठी २० हजार रुपये दिले जातील.
४.उपकरणांची मदत
ज्या शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब आहे तेथील विद्यार्थ्यांना 3D प्रिंटर, इंटरनेट ऑफ थिंग्स किट,AI, रोबोटिक्सशी निगडीत सायन्स, टेक्निकल, इंजिनियरिंग, गणित या विषयातील उपकरणे मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.