Navya Yojana Saam Tv
बिझनेस

Navya Yojana: केंद्राची मुलींसाठी खास 'नव्या योजना'! व्यावसायिक प्रशिक्षण देणार; स्वतः च्या पायावर करणार उभं करणार

Navya Yojana For Girls: सरकारने मुलींसाठी खास नव्या योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी नवीन योजना सुरुवात केली आहे. महिला व बालविकास विभाग आणि कौशल्य आणि उद्योजकता विभागाने मिळून ही योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव नव्या योजना आहे. या योजनेत मुलींना मदत केली जाते. त्यांचे भविष्य चांगले होण्यासाठी हातभार लावला जातो.

सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यानंतर आता अजून एक नव्या योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना केवळ आर्थिक लाभ नाही तर त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली जाते. पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत २०२४ च्या दृष्टीकोनाचा हा एक प्रयत्न आहे.

नव्या योजना आहे तरी काय? (Navya Yojana For Girls)

नव्या योजनेत मुलींना अनेक विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलींना व्यवसायिक कौशल्ये शिकवली जाणार आहे. ग्राफिक डिझाइनिंग, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, स्मार्टफोन तंत्रज्ञ, सोलर पॅनल बसवणे, ड्रोन असेंब्लिंग, मोबाईल रिपेअरिंग, सीसीटीव्ही बसवणे इत्यादी कामांसाठी प्रशिक्षण दिले जाईल.

ही योजना सरकारने २४ जून २०२५ रोजी सुरु केली. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातून ही योजना सुरु केली. हा पायलट प्रोजेक्ट आहे. देशातील ९ राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु केली आहे. ज्या जिल्ह्यांना सामाजिक आणि आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत १६ ते १८ वयोगटातील मुलींना लाभ मिळणार आहे. मुलींनी किमान १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

या योजनेत सात तासांच्या स्पेशल ट्रेनिंग मॉड्युल अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. याचशिवाय त्यांना कम्युनिकेशन ट्रेनिंग दिले जाईल. या योजनेत अर्ज कसा करायचा याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच ही अर्जप्रक्रिया सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी नाश्ता करताना अस्वस्थ वाटलं, नंतर हृदयविकाराचा झटका; स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Kolhapur Politics: चाणक्यांमुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ-घाटगेंची युती घडवण्यात फडवणीसांचा हात

Maharashtra Live News Update: शिंदेसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Dombivli News : डोंबिवलीतील अनधिकृत ६५ इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?

२ महिन्यांवर लग्न, डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं; कॅफेच्या नवव्या मजल्यावर गेली अन्...

SCROLL FOR NEXT