Namo Shetkari Yojana Saam Tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात ₹२००० जमा होणार; 'नमो शेतकरी'साठी निधी मंजूर

Namo Shetkari Yojana 8th Installment: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे.

Siddhi Hande

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

खात्यात २००० जमा होणार

नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी निधी मंजूर

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी योजनेसाठी निधी जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यानंतर आता हप्ता वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत काल म्हणजेच सोमवारी मंजुरी दिली आहे.

नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार (Namo Shetkari Yojana Installment)

राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटींचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. शेतकरी गेल्या ३ महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.

नमो शेतकरी योजनेचा ८वा आणि नववा हप्ता रखडला होता. आता त्यातील एका हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नमो शेतकरी योजनेचा शेवटचा हप्ता दिला होता. त्यानंतर अनेक महिने शेतकऱ्यांनी वाट पाहिली आहे.

राज्यातील एकूण ६५ लाख १५३ शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहे. यासाठी १८९२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, आठवा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना खूप दिवस वाट पाहावी लागली.

पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर आता लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेतही शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. आता ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा आठवा हप्ता जमा केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा; मुसळधार पावसाने शहर ठप्प

Weight Loss Recipe : वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत पदार्थ, वजन झटपट होईल कमी

Maharashtra News Live Update: राळेगांवमध्ये भाजपचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

Chanakya Niti: पुरुषांच्या या 6 सवयी करिअर करतात उद्धवस्त, आत्ताच व्हा सावध अन्यथा...

SCROLL FOR NEXT