Namo Drone Didi Scheme meta ai
बिझनेस

Drone Didi Yojana: 'नमो ड्रोन दीदी' योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Namo Drone Didi Scheme : केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेत महिला बचत गटातली सदस्यांना मोफत ड्रोन प्रशिक्षण दिले जाते. पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ आणि रोजगाराच्या संधींबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

ग्रामीण भागातल्या महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 'नमो ड्रोन दीदी योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिला शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनच्या मदतीने खत आणि औषध फवारणीची सेवा देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

कोणत्या महिलांना मिळतो लाभ?

तर या योजनेचा लाभ हा महिला बचत गट (Self Help Group - SHG) सदस्यांना दिला जातो. अर्ज करणारी महिला नोंदणीकृत बचत गटाची सदस्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर सरकारी नियम आणि पात्रतेनुसार लाभार्थी महिलांची निवड केली जाते.

अर्ज कसा करायचा?

ड्रोन दीदी योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नसते. यासाठी महिलांनी प्रथम आपल्या गावातल्या किंवा परिसरातली महिला बचत गटाशी जोडलेले असावे. यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या कृषी विभाग, जिल्हा प्रशासन किंवा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (NRLM) कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित अधिकारी योजनेची माहिती देतात आणि पात महिलांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

प्रशिक्षणात काय शिकवलं जातं?

निवड झालेल्या महिलांना ड्रोन उडवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये शेतात खत आणि कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी, ड्रोनची देखभाल, तसेच सुरक्षा नियमांची माहिती दिली जाते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर महिलांना अधिकृत प्रमाणपत्र दिलं जातं.

महिलांसाठी मोठी संधी

प्रशिक्षणानंतर महिला शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीची सेवा देऊन स्वत:चा रोजगार सुरू करू शकतात. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही वेळ, मेहनत आणि खर्च कमी होतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

टीप: योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या जिल्ह्यातील संबंधित सरकारी कार्यालय किंवा महिला बचत गटामार्फत अधिकृत माहिती घेऊनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : मुंबईजवळचे 'हे' शांत अन् निसर्गरम्य हिल स्टेशन पाहताच लोणावळा-माथेरान विसराल, पावसाळ्यात वीकेंड करा स्पेशल

Maharashtra News Live Update: मेळघाटातील विषबाधा प्रकरण तापलं; आदिवासी मंत्र्यांसमोर पालकांचे आंदोलन, सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी

फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर...; नरेंद्रचार्य महाराजांचे मोठं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी 6 महिन्यांची मुदत वाढवली का? अदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

Brain Cancer: सकाळी वारंवार डोकं दुखतंय? डोकेदुखी ठरू शकते धोक्याची घंटी

SCROLL FOR NEXT