Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एकाचवेळी ₹४५०० मिळणार, ८ दिवसात सरकार मोठा निर्णय घेणार, वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana 4500 Rupees Installment Come Together: लाडकी बहीण योजनेत आता महिलांना ४५०० रुपये एकत्र दिले जाणार आहेत. मार्च-एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Siddhi Hande

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर

लाडक्या बहिणींना ४५०० रुपये एकत्र मिळणार

३ महिन्याचे हप्ते एकत्र जमा होणार

राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहि‍णींना ३ महिन्याचे हप्ता एकत्र दिले जाणार आहे. एकाच वेळी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामळे लाडक्या बहि‍णींना रखडलेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लाडक्या बहिणींना ₹४५०० एकत्र मिळणार? (Ladki Bahin Yojana Women Get 4500 Rupees Together)

लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी देणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींना तिन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहे. एकाचवेळी खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहे. ज्या लाडक्या बहि‍णींनी ईकेवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. सध्या लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच पैसे जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १६ मे रोजी अधिकारी मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा केले जातील.

या महिलांनाच मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana These Women Will Get Benefit)

लाडकी बहीण योजनेत फक्त ईकेवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसीत अजूनही दुरुस्ती केलेली नाही त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. आता लाडक्या बहिणींना रखडलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT