Mahila Rojgar Yojana Saam Tv
बिझनेस

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana: मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेत महिलांना १०,००० ते २ लाख रुपयांची मदत मिळते.

Siddhi Hande

सरकारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना

महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळतात पैसे

महिलांना मिळणार २ लाख रुपये

केंद्र सरकारसोबतच अनेक राज्य सरकारने महिलांसाठी योजना सुरु केल्या आहेत. नुकत्याच बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्याआधी सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेअंतर्गत १.५१ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता म्हणजे २ लाख रुपये कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहे. दरम्यान, आता याबाबत बिहार सरकारने माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)

बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आतापर्यंत १.५१ लाख महिलांना १०-१० हजार रुपये दिले आहेत.राज्यात उपजीविका गटांची संख्यादेखील १.१४ कोटी झाली आहे. ही योजना भविष्यात सुरु राहणार आहे.

२ लाख रुपये कसे मिळणार?

मंत्री श्रवण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत ज्या महिलांना १०,००० रुपयांचा पहिला हप्ता वापरुन स्वतः चा व्यवसाय सुरु केला. त्यांनाच २ लाख रुपये मिळणार आहे. दरम्यान, प्रत्येक महिलेला २ लाख रुपये मिळणार नाहीत. व्यवसायाच्या गरजेनुसार हे पैसे दिले जाणार आहे. जर एखाद्या महिलेने कोणताही व्यवसाय सुरु केला त्यासाठी फक्त ५०,००० रुपये भांडवलाची गरज असेल तर तेवढे पैसे पाठवले जाणार आहे.सर्व महिलांना २ लाख रुपये मिळणार नाही.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा ६ महिन्यांनी आढावा जाईल. जर सरकारला असे दिसले की, लाभार्थी महिलेचे १०,००० रुपये योग्यरित्या वापरले आहेत तिचा व्यवसाय उत्तम पद्धतीने सुरु आहे तर त्यांचे उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार अहवाल तयार करेल. यानंतर तुमच्या प्रस्तावाचा आढावा घेतला जाईल आणि निधी वाढवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT