Shreya Maskar
रॅपर आणि गायक बादशाहाचा आज (19 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. आज बादशाहा 40 वर्षांचा झाला आहे.
'बंदूक' (Bandook) हे बादशाहचे पहिले गाणे आहे. 1 ऑगस्ट 2014 ला ते रिलीज झाले. बादशाहाने आपल्या आवाजाने अवघ्या जगाला वेड लावले आहे.
'काला चष्मा', 'गेंदा फूल', 'पानी पाणी', 'गर्मी', 'डीजे वाले बाबू', 'प्रॉपर पटोला' आणि 'कर गई चुल' ही प्रसिद्ध गाणी आहेत.
बादशाहा संगीत, ब्रँड जाहिराती, व्यवसाय, रिअल इस्टेट गुंतवणूक यांमधून पैसा कमावतो. तो आज एक यशस्वी गायक आहे.
बादशाहाचे दिल्ली, चंदीगड, मुंबई येथे आलिशान घर आहे. तसेच लंडन आणि दुबई येथे मालमत्ता आहे.
बादशाहा दिल्ली आणि मुंबईतील नाईटक्लबचा सह-मालक आहे. ज्याचे नाव 'Dragonfly Experience' आहे. Badboy Pizza मालक बादशाहा आहे.
बादशाहकडे अनेक कारचे कलेक्शन आहे. यात रोल्स-रॉयस, लॅम्बोर्गिनी, पोर्श, ऑडी, मर्सिडीज यांचा समावेश आहे. त्याला कार खूप आवडतात.
मीडिया रिपोर्टनुसार, बादशाहाची एकूण संपत्ती ₹124 कोटी रुपयांच्यावर आहे. बादशाहा एक लग्जरी आयुष्य जगत आहे.