Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खरंच २१०० रुपये मिळणार का? 'या' महिलांचा अर्ज होणार बाद; कारण काय?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update : सध्या लाभार्थी महिला 'लाडकी बहीण योजना'च्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. येणारा हप्ता किती रुपयांचा असू शकतो, याची माहिती जाणून घ्या.

Shreya Maskar

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'माझी लाडकी बहीण योजना' राबवली आहे.महाराष्ट्रात अनेक महिला 'लाडकी बहीण योजना'चा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update) लाभ घेत आहेत. दिवाळीपर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला दर महिना १५०० रुपये दिले जात होते. आता लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

सरकारने आता 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन लाडक्या बहिणींना केले आहे. मात्र अद्यापही या बाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' बाबत नवीन अनेक खुलासे केले. यात लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये पात्र नसलेल्या महिलांचे फॉर्म नाकारले जाऊ शकतात.

'लाडकी बहीण योजना' पात्रता

  • ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. त्यांना यापुढे 'लाडकी बहीण योजना'चे पैसे येणार नाही.

  • आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

  • लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ घेत असल्यास त्या महिलेला 'लाडकी बहीण योजना'चा लाभ मिळणार नाही.

  • कुटुंबातील कोणाकडेही पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द करण्यात येईल.

  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात काम करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

  • कुटुंबातील सदस्यांना जर सरकारी निवृत्ती वेतन मिळत असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

2024 मध्ये 'माझी लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Maharashtra Live News Update : सौदी अरेबियातून शेनलॉन्ग जहाज मुंबईत दाखल

टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

SCROLL FOR NEXT