Tanvi Pol
सध्या सर्वत्र लाडकी बहिण योजनेची चर्चा होत आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे.
मात्र सध्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे अकाउंटवर आले की नाही हे पाहायचे असते.
अशातच अनेक महिलांना ते योजनेचे पैसे ऑनलाइन कसे तपासायचे हे माहिती नाही.
पहिल्यांदा https://myaadhaar.uidai.gov.in/ या साईटवर जावा.
साईटवर गेल्यानंतर तुमचा आधारकार्ड नंबर टाकून ते लॉगिन करावे.
काही वेळात तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
ओटीपीनंबर टाकल्यानंतर Bank Seeding Status हा पर्याय दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहिन योजनेचे पैसे आले की नाही हे ऑनलाइन तपासू शकता.