Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही? या सोप्या पद्धतीने करा चेक

How to Check Ladki Bahin Yojana Installment Recieved Or Not: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ सप्टेंबरला महिलांना मिळणार आहे. या योजनेत तुमच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे या पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत पहिले दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहे. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही कसं चेक करायचं?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या बँक अकाउंटला पैसे तेव्हाच जमा होतील जेव्हा तुमचे अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असेल.बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसल्यास तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत.त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करु शकतात. याचसोबत जर तुमचा बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज लगेच येईल.

तुम्ही तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात. अॅपवर जाऊन तुम्ही बॅलेंस चेक करु शकतात. किंवा तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करा. त्यात तुम्हाला पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.

सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार?

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे. त्यांच्या अकाउंटला किती पैसे येणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्यांना मागील तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT