Free Aadhar Update
Free Aadhar UpdateSaam Tv

Free Aadhar Update: आधार कार्ड अपडेटची तारीख पुन्हा वाढवली, मोफत घ्या लाभ, नवीन डेडलाइन कोणती?

Free Aadhar Update Deadline Extended: मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या.
Published on

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक कामासाठी आधार कार्डची गरज ही असतेच. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ होती. मात्र, ही मुदत आता वाढवली आहे. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करु शकतात. त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही आधार कार्ड अपडेट करु शकतात. यामुळे आधार कार्डधारकांना अपडेट करण्यासाठी कालावधी मिळणार आहे.

सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढवली आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमचे आधार कार्ड अपडेट करता येईल. तुमच्या आधार कार्डमध्ये जर कोणती चुक असेल किंवा तुम्हाला माहिती बदलायची असेल तर ते मोफत अपडेट करता येणार आहे. UIDAI नुसार आधार कार्डधारकांनी त्यांची कागदपत्रे अपडेट करायला हवी.

Free Aadhar Update
SBI Scheme: SBI च्या ५ जबरदस्त योजना! फक्त ४४४ दिवसांमध्ये गुंतवणूकदार होणार श्रीमंत

मोफत आधार कार्ड अपडेट (Free Aadhar Card Update Deadline Increase)

तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीने मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. जर तुम्ही आधार केंद्रात जाऊन अपडेट करत असाल तर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन घरच्या घरी तुम्ही आधार अपडेट करु शकतात.

आधार कार्डमध्ये तुम्ही कागदपत्रे अपडेट करु शकतात. तुमची माहिती, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर ही माहिती तुम्ही बदलू शकतात.

Free Aadhar Update
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

मोफत आधार कार्ड अपडेट कसं करायचं? (Aadhar Card Update Process)

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइला भेट द्या.

  • त्यानंतर आधार अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाका.

  • यानंतर कागदपत्रे अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती दिसेल.

  • यानंतर सर्व माहिती वेरिफाय झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होण्याची प्रक्रिया सुरु होईल.

  • यानंतर तुम्हाला १४ नंबर असलेला रिक्वेस्ट नंबर दिसेल. या नंबरवरुन तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेटची प्रोसेस ट्रॅक करु शकतात.

Free Aadhar Update
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com