Free Aadhar Update: फुकटात आधार कार्ड करा अपडेट, फक्त ४ दिवस उरले; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Free Aadhar Update Process: मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लगेच करा.
Free Aadhar Update
Free Aadhar UpdateSaam Tv
Published On

सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करुन घेणे गरजेचे. सप्टेंबर महिन्यात आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनही आधार कार्ड अपडेट केले नाही त्यांनी लगेच करावे. UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख निश्चित केली आहे.

१४ सप्टेंबर ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शवेटची तारीख आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करावे.

Free Aadhar Update
SBI Scheme: SBI च्या ५ जबरदस्त योजना! फक्त ४४४ दिवसांमध्ये गुंतवणूकदार होणार श्रीमंत

भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे ओळखपत्र आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची गरज भासते. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर त्या बदलण्यासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागते. आधार कार्ड अपडेट आता मोफत होते. परंतु १४ सप्टेंबरनंतर तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतील.

आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत ही १४ मार्चपर्यंत होती. मात्र, ही मुदत वाढवून १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. UIDAI द्वारे आधार अपडेट करण्याची मोफत सर्व्हिस myAadhaar या पोर्टलवर उपलब्ध आहे. तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकतात.

Free Aadhar Update
Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस

  • UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.

  • होमपेजवरील myAadhaar वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाइल नंबर टाका. ओटीपी आल्यानंतर लॉग इन करा.

  • यानंतर तुम्ही तुमची माहिती चेक करा.

  • जर काही चुकीची माहिती असेल तर ड्रॉप डाउन मेन्यूमधून कागदपत्रे निवडा आणि अपलोड करा.

Free Aadhar Update
PPF Scheme: 'ही' सरकारी योजना बनवेल तुम्हाला करोडपती, 12,500 रुपये गुंतवल्यानंतर मिळणार एवढी मोठी रक्कम; वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com