Mukhyamantri Annapurna Yojana Saam Tv
बिझनेस

Annapurna Yojana: फक्त ‘लाडकी बहीण’चं नव्हे तर सरकारची महिलांसाठी आणखी एक योजना, कोणाला लाभ मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत कुटुंबियांना अन्नधान्यांचे मोफत वाटप केले जाते. त्याचसोबत नागरिकांना मोफत सिलेंडरदेखील मिळणार आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबियांना फायदा होणार आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक वस्तू मोफत मिळाव्यात, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. राज्यातील दुर्बल घटकातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवण्यात आसी आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नागरिकांना स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ दिले जातात. यामध्ये गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक गोष्टी कमीत कमी दरात दिल्या जातात. तसेच ६५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत १० किलो धान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणार आहेत.

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता महिलांना ३ सिलिंडर मोफत मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर सिलिंडरची जोडणी असणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.१४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरची जोडणी असणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT