Mukhyamantri Annpurna Yojana: काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला, किती सिलिंडर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mukhyamantri Annpurna Yojana: अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलीय. या योजनेतून गरीब कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे.
Mukhyamantri Annpurna Yojana: काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला, किती सिलिंडर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mukhyamantri Annpurna Yojana

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर दिले जातील.

महाराष्ट्राचा 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आलाय. त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा' योजना. या योजनेंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्र सरकार जनतेच्या हितासाठी एकामागून एक योजना सुरू करत आहे.

काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? काय आहे उद्देश?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत ५ सदस्यांच्या कुटुंबाला आता वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. राज्यातील दुर्बल घटकातील लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेतून गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. यातून ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरिबी कमी करण्यासाठी सामन्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून देऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्नही सरकार यातून करणार आहे. तसेच या योजनेतून गरीब लाभार्थ्यांना अन्न सामुग्री बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत मिळेल. तांदूळ, गहू आणि इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात पुरवले जाणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

लाभार्थ्यांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतात.

लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेत असावं.

'मुख्यमंत्री अन्नपूर्णा' योजनेंतर्गत आता ५ सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर दिले जातील.

Mukhyamantri Annpurna Yojana: काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला, किती सिलिंडर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजने'चा कोणाला घेता येणार लाभ, काय आहेत नियम-अटी? शासन निर्णयातून समोर आली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com