Mukesh Ambani Success Tips Saam Tv
बिझनेस

Mukesh Ambani Success Tips: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मुकेश अंबानींनी सांगितलेल्या १० गोष्टी; वाचा

Mukesh Ambani Success Tips For Youth: मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या यशाचं कारणं सांगितलं आहे. त्याचसोबत तरुणांना मोठी स्वप्न बघण्याचा सल्ला दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरती इंगळे, साम टीव्ही

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी अदन यमन नावाच्या देशात झाला. 1981 पासून रिलायन्स, रिलायन्स या आपल्या कुटुंबातील व्यवसायात त्यांनी वडिल धिरुभाई अंबानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने अब्जाधीशांच्या यादीत ते आले. अंबानी कुटुंब त्यांच्या याच संपत्तीमुळे कायमच चर्चेत असतं. त्यांच्या यशस्वी असण्यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का? नसेल केला तर वाचा त्यांच्या यशस्वी असण्यामागच्या खास 10 टिप्स.

कठोर परिश्रम करूनही काहीवेळा यश मिळत नाही, अशा वेळी तुमच्यात सबुरी असणं अत्यंत गरजेच आहे. शांततेनं विचारपूर्वक कोणतही काम केल्यास ते व्यवस्थित होत. इतरांपेक्षा आपल्यात काय वेगळं आहे हे शोधा त्याने तुमच्या यशाचा मार्ग सुकर होईल. उज्वल भविष्यासाठी नेहमी काहीतरी नवीन विचार करा, रोज नव्या गोष्टी शिकरत राहा, नकरात्मक विचार करण्यापेक्षा अजून मेहनत घेऊन कार्य यशस्वी करा.

यशस्वी होण्यासाठी अंबानींनी सांगितलेल्या 10 टिप्स

1. जोखीम घ्या

आयुष्यात रिस्क घ्यायला शिका कारण हा शिकण्याचा एकमेव मार्ग आहे.

2. प्रत्येकाला महत्व द्या

पैसा सर्वस्व आहे पण माणसांपेक्षा जास्त पैसा महत्वाचा नाही त्यामुळे माणसांना महत्व द्या.

3. विश्वास

प्रत्येकावर विश्वास ठेवा मात्र कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वत: मेहनत करा.

4. स्वप्न बघा

मोठी स्वप्न बघा मात्र ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. योजना आखा.

5. विचार करा

उज्वल भविष्यासाठी नेहमी काहीतरी नवीन विचार करा, काहीतरी वेगळं करा.

6.संघर्ष

संघर्ष करा, खचून न जाता पूर्ण ताकदीनं काम करा.

7. कामात नीटनेटकेपणा

हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका, फक्त तुमच्या कामात तरबेज व्हा.

8. मनाचं ऐका

इतरांचं न ऐकता कायम तुमच्या मनाचं ऐका. लोकांच्या सांगण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका.

9. सतर्क राहणं

तुमच्या आजूबाजूला काय घडतं याची माहिती ठेवा.

10. प्रोत्साहन

नेहमी सर्वांना प्रोत्साहन द्या, त्यामुळे स्वत:सोबत आजूबाजूचं वातावरण चांगलं राहील.

मुकेश अंबानी यांच्या या खास 10 टिप्स जर तुम्ही सुद्धा आचरणात आणल्या, तर तुम्हीही त्यांच्याप्रमाणे यशस्वी होऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT