Eyelash Care: भुवयांचा रंग फिकट दिवसेंदिवस फिकट दिसतोय? या सोप्या टीप्सने भुवया दिसतील एकदम ठळक

Surabhi Jayashree Jagdish

भुवया

अनेक महिलांच्या भुवयांचा रंग फिकट दिसायला लागला की, चेहऱ्याचा एकूण लूक थकलेला आणि वेगळा वाटू लागतो. वाढतं वय, जास्त केमिकल प्रॉडक्ट्स, पोषणाची कमतरता किंवा चुकीची काळजी यामुळे भुवया विरळ आणि रंग फिकट होऊ शकतो.

घरगुती उपाय

मात्र काही सोप्या आणि घरच्या उपायांनी भुवयांना पुन्हा नैसर्गिक ठळकपणा देता येतो. नियमित काळजी घेतली तर मेकअपशिवायही भुवया सुंदर दिसू शकतात.

एरंडेल तेलाचा नियमित वापर

रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेल हलक्या हाताने लावा. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देतं आणि रंग गडद होण्यास मदत करतं. आठवडाभरातच फरक जाणवायला लागतो.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

कढीपत्त्याची पेस्ट करून ती खोबरेल तेलात मिसळा. ही पेस्ट आठवड्यातून २ वेळा भुवयांवर लावा. नैसर्गिक पद्धतीने भुवयांचा रंग गडद दिसू लागतो.

बदाम तेलाची मालिश

बदाम तेलात व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असतं. दररोज २ मिनिटं भुवयांची हलकी मालिश करा. भुवया जाड आणि ठळक दिसण्यास मदत होते.

अ‍ॅलोवेरा जेलचा वापर

ताजं अ‍ॅलोवेरा जेल थेट भुवयांवर लावा. यामुळे केसांची वाढ सुधारतं आणि रंग फिकट होणं कमी होतं.

हलक्या हाताने चेहरा धुवा

भुवया वारंवार साबणाने धुणं टाळावं. जास्त घासल्याने केस कमकुवत होऊन रंग फिकट होतो.हलक्या हातानेच चेहरा स्वच्छ करा.

केमिकल प्रोडक्ट्सपासून दूर राहा

भुवयांवर जास्त केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरू नका. हार्श क्रीम्सच्या वापरामुळे रंग आणखी फिकट होतो. अशावेळी नैसर्गिक उपायांवरच भर द्या.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

येथे क्लिक करा