न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह खातेदारांसाठी एक दिलासादायक बातमी. आर्थिक अडचणीत सापडलेली न्यू इंडिया बँक आता सारस्वत बँकेसोबत विलीन होणार आहे. न्यू इंडिया बँकेच्या विलीनीकरणासाठी सारस्वत को ऑपरेटिव्ह बँकेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. हे विलीनीकरण दोन्ही बँकांच्या भागधारकांच्या संमतीनंतरच पूर्ण होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को - ऑपरेटिव्ह बँकेवर कर्जवाटप, तसेच ठेव आणि पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. १३ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी ग्राहकांना फक्त २५ हजार पर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती.
न्यू इंडिया कॉ-ऑपरेटिव्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांनंतर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप घेतला होता. या घोटाळ्यात सुमारे १२२ कोटी रूपयांचा गैरव्यवहार समोर आला. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांना ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या विलीनीकरणामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. सारस्वत बँकेच्या देशभरात ३१२ शाखा आहेत. तर, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २७ शाखा आहेत. त्यापैकी बहुतांश शाखा मुंबईत आहेत. सारस्वत बँकेचा एकूण व्यवसाय ९१८१५कोटी आहे. तर, सारस्वत बँकेचा व्यवसाय ३५६० कोटी आहे.
या विलीनीकरण प्रक्रियेवर गेल्या ३ महिन्यांपासून काम सुरू आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सारस्वत बँकेचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांमध्ये मजबूत नेटवर्क आहे. तर, न्यू इंडिया बँकेचे ग्राहक प्रामुख्याने मुंबई, पालघर, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि सुरत या शहरांमध्ये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.