Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

Today's Gold Price: सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ! २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,००० रुपये तर चांदी १.११ लाख प्रति किलोवर. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण.

Bhagyashree Kamble

भारतात सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किमतीत ६०० रूपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९००० रूपये आहे. तर, एक किलो चांदीचा दर १,११,००० रूपये आहे. ११ जुलै २०२५ रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सराफा बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घेऊयात.

मुंबईत सोने आणि चांदीचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति ग्रॅम ९०,७५० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,०००

चांदी - १,११,००० रूपये प्रति किलो.

दिल्लीतील सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,९०० रुपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,१५० रूपये

चेन्नईतील सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,७५० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,००० रूपये.

कोलकाता: सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ८९,९९० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,००० रूपये.

जयपूर : सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,९००० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,१५० रूपये.

नोएडामधील सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,९०० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,१५० रूपये.

गाझियाबाद : सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,९००० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,१५० रूपये.

लखनऊ : सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,९०० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,१५० रूपये.

बंगळूरूमधील सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,७५० रूपये.

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,००० रूपये.

पटनामधील सोन्याचा दर

२२ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९०,७५०

२४ कॅरेट सोनं - प्रति १० ग्रॅम ९९,०००

बाजारातील गोंधळ आणि ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण

मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत कोणतीही मोठी घोषणा न झाल्यामुळे सोनं चांदीच्या दरात बदल झाला. सोनं चांदीच्या दरात वाढ झाली. दरम्यान, डॉलर निर्देशांक ९७.३ पर्यंत घसरला आणि ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्यामुळे सोन्याला थोडासा आधार मिळाला.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधून येणाऱ्या तांबे आणि इतर वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली. मात्र, त्यांनी चीन आणि युरोपियन युनियनसोबत सुरू असलेल्या चर्चांना सकारात्मक ठरवत काहीसा दिलासा दिला आहे.

भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क आणि कर, रूपये आणि डॉलरमधील दर, मागणी आणि पुरवठ्याचा समतोल या आधारावर निश्चित केली जाते. भारतात सोन्याचा दर केवळ गुंतवणुकीसाठी नाही तर, सणासुदीच्या काळातही खरेदी केली जाते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील बदलाचा थेट परिणाम लोकांवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT