Maruti Jimny Discounts Saam Tv
बिझनेस

Maruti च्या या SUV वर मिळत आहे 3.30 लाखांची सुट, ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट

Satish Kengar

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही जिमनीवर जबरदस्त सूट देत आहे. कंपनी आपल्या या कारवर आधीपासूनच सूट जाहीर केली होती. मात्र आता गेल्या महिन्याच्या तुलनेत या सवलतीत 80,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

याशिवाय कंपनीने Fronx वरही चांगली सूट देत आहे. जिमनी ही एक जबरदस्त ऑफ रोड एसयूव्ही आहे. यातच या दोन्ही कार्सवर कंपनी किती सूट सेट आहे आणि याची किंमत किती आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

जिमनीवर 3.30 लाख रुपयांची सूट

मारुती सुझुकी आतापर्यंत जिमनीवर 2.50 लाख रुपयांपर्यंत सूट देत होती, मात्र आता त्यात 80,000 रुपयांनी वाढ केली आहे. आता तुम्ही जिमनीवर 3.30 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच कंपनी आपल्या जिमनीच्या टॉप व्हेरियंट Alpha वर 1.80 रुपयांची सूट देत आहे.

जिमनी Zeta ला आता MSSF योजनेत 2.75 लाखांपर्यंतचे फायदे मिळत आहे. जिमनीच्या किमती 12.74 लाख ते 14.95 लाख दरम्यान आहे. मात्र सूटसह ही कार तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. या ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही Nexa शोरूमशी संपर्क साधू शकता.

जिमनीमध्ये 1.5 लीटर के सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे. ही कार एका लिटरमध्ये 16.94 किमीपर्यंत मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. ही 4 व्हील ड्राइव्हसह येते. ऑफ रोडसाठी ही कार बेस्ट आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Fronx वर 85,500 रुपयांची सूट

या महिन्यात मारुती सुझुकीने त्यांच्या कॉम्पॅक्ट SUV Fronx वर सूट वाढवली आहे. याआधी या कारवर 75,000 रुपयांची सूट दिली जात होती, तर आता या कारवर 85,500 रुपयांची सूट दिली जात आहे. या सवलतीमध्ये 32,500 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 43,000 रुपयांच्या व्हेलॉसिटी एडिशन किटचाही समावेश आहे. Fronx ची किंमत 7.51 लाख ते 13.04 लाख रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT