Maruti Suzuki e-Vitara launched in India with 500km range and premium hi-tech features. saam tv
बिझनेस

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

Maruti Suzuki First Electric SUV e-Vitara Launch: मारुती सुझुकी कपंनीने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही e-Vitara लाँन्च केली आहे. ही कार भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये लोकप्रिय ठरेल, अशी आशा कंपनीला आहे.

Bharat Jadhav

  • मारुती Suzuki ने भारतातील त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही e-Vitara लाँन्च केली आहे.

  • ५ हायटेक फीचर्समुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.

  • भारतीय ईव्ही मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता

मारुतीने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, ई-विटारा लाँन्च केली आहे. ही कार आधी eVX म्हणून बाजारात आणण्यात आली होती. आता ही कारनं नवीन रुप घेत भारतीय ईव्ही बाजारात एंट्री घेतलीय. दरम्यान ही एसयूव्ही जगभरातील अनेक देशांमध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे, परंतु कंपनीने नुकतीच भारतात लाँन्च केली आहे.

डिझाइन आणि प्रीमियम लूक

e-Vitara ही केवळ इलेक्ट्रिक कार नाही तर तंत्रज्ञान आणि फीचर्समध्येही खूप प्रगत आहे. दरम्यान या कारची किंमत किती असेल याची अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. ई-विटारा प्रथम eVX म्हणून सादर करण्यात आली होती आणि आता ही कार नव्या रुपात आल्याचं म्हटलं जात आहे. या एसयूव्हीला खास डिझाइन करण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही ही कार पाहाल पाहताच क्षणी तुम्हाला प्रीमियम फील देते.

Maruti Suzuki e-Vitara या एसयूव्हीचे सर्वात मोठे हाय-टेक फीचर म्हणजे तिची लेव्हल २ एडीएएस प्रणाली. यात अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ नियंत्रण, लेन कीप असिस्ट आणि इतर ड्रायव्हिंग सपोर्ट सिस्टम सारख्या अनेक प्रगत फीचर्स आहेत. या फीचर्समुळे कार सुरक्षिता वाढवते. विशेष म्हणजे लांब प्रवासात चालकाला थकवा जास्त जाणवत नाही.

या एसयूव्हीमध्ये ३६०-डिग्री फिरणारा कॅमेरा देण्यात आलाय. या कॅमेऱ्यामुळे ड्रायव्हरला कारभोवतीचा संपूर्ण भाग स्क्रीनवर पाहता येतो. हे फीचर्स अरुंद जागेत कार पार्किंग करताना आणि गाडी चालवताना उपयुक्त ठरत असते. मारुती सुझुकी ई-वितारामध्ये हेड-अप डिस्प्ले फीचर देखील आहे, जे ड्रायव्हरला महत्त्वाची माहिती दाखवते.

यामध्ये वेग, नेव्हिगेशन इत्यादी तपशील थेट विंडशील्डवर दिसत असतात. यामुळे ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा स्क्रीनकडे पाहण्याची गरज भासत नसते. यासोबतच यात ड्युअल डिजिटल स्क्रीन सेटअप आहे. यात १०.२५-इंच टचस्क्रीन आणि १०.१-इंच ड्रायव्हर डिस्प्लेचा समावेश आहे.

हवेशीर आणि पॉवर सीट्स

ई-विटारामधील पुढच्या सीट्स हवेशीर आणि आरामदायी आहेत. तर तुम्ही लांब प्रवास करत असाल तर या सीट्स आराम देतात. शिवाय, ड्रायव्हरची सीट १० पायऱ्यांमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आहेत. जेणेकरून प्रत्येक ड्रायव्हर त्याच्या आवडीनुसार बसण्याची जागा सेट करू शकतो.

वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटी

तुमचा फोन चार्ज करण्यासाठी केबल्स लावणे ही एक त्रासदायक गोष्ट असते. मात्र मारुती सुझुकी ई-विटारामध्ये वायरलेस चार्जिंग करता येते. यामुळे गाडी चालवताना वायरलेस चार्जिंग करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दुबई मरीना बीचचा रोमांच जुहू समुद्रकिनारी अनुभवता येणार

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT