Maruti Suzuki Car Saam Tv
बिझनेस

Maruti Suzuki: कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जोर का झटका,मारुती सुझुकीच्या कारच्या किंमती वाढल्या!

Maruti Suzuki Car Prices: मारुती सुझुकी ही नावाजलेली कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने वाहनांच्या किंमतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maruti Suzuki Car Prices Increases:

मारुती सुझुकी ही नावाजलेली कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असतात.कार कंपनीने वाहनांच्या किंमतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.

आज म्हणजेच १६ जानेवारीपासून मारुती सुझुकीच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने आधीच माहिती दिली होती.कंपनीच्या सर्व मॉडेलची सरासरी किंमत ०.४५ टक्क्यांनी वाढली आहे. ही किंमत दिल्लीतील मॉडेल्सची सरासरी किंमतींवर आधारित आहे. खर्च वाढल्याने कंपनीच्या किंमती वाढल्या आहेत, असे कंपनीने सांगितले आहे. (Latest News In Marathi)

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने जानेवारी २०२४ मध्ये आपल्या सर्व कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. महागाई आणि वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यामुळे कंपनी कारच्या किंमती वाढवत आहेत. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकी कंपनीने मागील वर्षी १ एप्रिल रोजी तिच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एक्स शोरुमच्या किंमतीवर ०.४५ टक्यांनी वाढ केली आहे.

कंपनीच्या २०२३ मध्ये किती युनिट्स विकल्या आहेत?

मारुती सुझुकी कंपनीने २०२३ मध्ये जवळपास एकूण १३७,५५१ युनिट्स विकल्या होत्या. तर डिसेंबर २०२२ मध्ये १३९,३४७ युनिट्स विकले गेले होते. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये कंपनीने कमी युनिट्स विकल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT