FASTag यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी, याच महिन्यात करा हे काम, अन्यथा महागात पडेल!

FASTag KYC Update : रस्त्यावर वाहन चालवताना टोल टॅक्स भरणे आवश्यक असते. अनेकदा टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे टोल भरण्यासाठी FASTag वापरले जाते. FASTag बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
FASTag KYC
FASTag KYC Saam Tv
Published On

FASTag KYC Update Deadline:

रस्त्यावर वाहन चालवताना टोल टॅक्स भरणे आवश्यक असते. अनेकदा टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे टोल भरण्यासाठी FASTag वापरले जाते. वाहनावर FASTag असल्यावर तो स्टिकर स्कॅन होऊन टोल आपोआप बँक अकाउंटमधून कट होतो. परंतु आता FASTag युजर्संना केवायसी करणे महत्त्वाचे आहे.

तुम्हीही FASTag वापरत असाल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. जर तुम्ही केवायसी अंतिम तारखेच्या आत न केल्यास तुम्हाला टोल भरण्यास अनेक अडचणी येऊ शकतात.

याबाबत रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकाना सूचना दिल्या आहे. KYC मध्ये युजर्संना बँकानी आधीच जारी केलेला FASTag सोडावा लागेल. त्यानंतर अंतिम मुदतीनंतर FASTtag चे नवीन खाते सक्रिय राहील. तर आधीचे FASTag खाते ब्लॅकलिस्ट केले जाईल. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.

FASTag KYC
रॉयल एन्फिल्डची पॉवरफुल बाइक Shotgun 650 लाँच; लूक आणि फीचर्स एकदम 'रॉयल', किंमत जाणून घ्या

NHAI च्या नुकत्याच आलेल्या अहवालात एकाच वाहनासाठी अनेक FASTtag जारी करण्यात आल्याचे दिसून आले. यासोबतच आवश्यक KYC प्रोसेस पूर्ण न करता FASTtagचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे आरबीआयच्या नियमांचे उल्लघंन होत आहे. यामुळे जुन्या FASTagला ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. तसेच वाहनांच्या विंडशिल्डनर FASTtag लावल्या नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे टोलनाक्यांवर टोल भरण्यास विनाकारण विलंब होतो. यामुळेच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रिय प्राधिकरणाने one vehicle one FASTag मोहिमेवर भर दिला आहे.

NHAI च्या अहवालानुसार, ३१ जानेवारीनंतर फक्त नवीन फास्टटॅग खाते सक्रिय राहील. पूर्वीचे फास्टटॅग खाते निष्क्रिय केले जातील.

FASTag KYC
Gold Silver Rate (16th January 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com