Maruti Suzuki Dream Series Limited Edition Saam Tv
बिझनेस

Maruti Suzuki ने लॉन्च केल्या तीन स्वस्त कार, किंमती 4.99 लाख रुपयांपासून सुरू

Maruti Suzuki Dream Series Limited Edition: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Alto K10 VXI+, S-Presso VXI+ आणि Celerio LXI कार लॉन्च केल्या आहेत.

Satish Kengar

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या ड्रीम सिरीज लिमिटेड एडिशन अंतर्गत कमी किमतीत 3 कार लॉन्च केले आहेत. या सिरीजमध्ये Alto K10 VXI+, S-Presso VXI+ आणि Celerio LXI लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यांची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यासोबतच कंपनीने आपल्या AGS मॉडेल्सच्या किमती 5000 रुपयांनी कमी केल्या आहेत.

ड्रीम सीरीज लिमिटेड एडिशनबद्दल कंपनीने सांगितले की, परवडणारे मॉडेल असल्याने याची विक्री अधिक चांगली होईल. AGS प्रकारांच्या किमती 5000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत, या सिरीजमध्ये Alto K10, S-Presso, Celerio, Wagon-R, Swift, Dzire, Baleno, FRONX आणि Ignis मॉडेल्सचा समावेश आहे.

ड्रीम सिरीज लिमिटेड एडिशनचे फीचर्स

Alto K10 VXI+ ड्रीम सिरीज

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा

सेफ्टी फीचर्स

Celerio LXI ड्रीम सिरीज

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा

पायोनियर मल्टीमीडिया स्टिरिओ

स्पीकर 1 पेअर

S-Presso VXI+ ड्रीम सिरीज

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा

स्पीकर 1 पेअर

इंटरनल स्टाइलिंग किट

व्हील आर्क क्लॅडिंग

बॉडी साइड क्लेडिंग

साइड स्किड प्लेट

फ्रंट ग्रिल गार्निश (क्रोम)

नंबर प्लेट फ्रेम

मारुती सुझुकीने या तीन गाड्यांमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत, मात्र कंपनीने या कार्सच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कारण याचे इंजिन परफॉर्मन्स आणि मेलजेच्या बाबतीत सर्वोत्तम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT