Mahindra XUV700 AX5  Google
बिझनेस

Mahindra XUV700 AX5: आकर्षक लूक ,जबरदस्त सेफ्टी फीचर आणि बरंच काही; महिंद्राचा नवा मॉडेल लाँच

Mahindra XUV700 AX5 Price: कार खरेदी करण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. कार खरेदी करताना बजेट, कारची स्पेस, फिचर्स या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कार खरेदी करण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. कार खरेदी करताना बजेट, कारची स्पेस, फिचर्स या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. भारतातील कुटुंब ही मोठी आहेत. त्यामुळे भारतात 7 सीटर कारची क्रेझ वाढत आहे. अशातच महिंद्रा कंपनीने आपली नवीन 7 सीटर एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने आपल्या XUV700 चा AX5 व्हेरियंट लाँच केला आहे. जो AX3 आणि AX प्रकरांमध्ये येतो. या कारमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहे.

महिंद्रा Mahindra XUV700 AX5 Select Car ही आधुनिक फीचर्ससह लाँच केली आहे. या कारची किंमत १६.८९ लाख रुपये आहे.याआधी महिंद्राने या कारचे MX3 व्हेरियंट लाँच केले होते. जर तुम्ही नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर XUV 700 AX5 S हा चांगला पर्याय आहे.

फीचर्स

कंपनीच्या कारचे AX3 कार ही ५ सीटर आहे. परंतु आता Mahindra XUV700 AX5 व्हेरियंट 7 सीटर पर्यंयासह येतो. या कारमध्ये नवीन फिचर्स दिले आहे. यात तुम्हाला पॅनोरॅमिक सनरुफ, पुश बटण स्टार्ट/ स्टॉप आणि मॅप लॅम्प या सुविधा मिळतात. याशिवाय कारला ड्युअल 10.25 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील अनेक फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि पार्किंग सेन्सरचा समावेश आहे.

या नवीन कारमध्ये 2.0 लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. याचसोबत 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6- स्पीड टॉर्क कनर्व्हटर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत. डिझेल इंजिनमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT