Ladki Bahin Yojana September installment : महाराष्ट्र सरकारने दिवाळीमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतला. लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनाचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्याने पुढील दोन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ५ हजारांची दुष्काळी मदत आणि महिलांना १५०० रूपये, असा सरकारकडून लाभ दिला जात आहे. (Ladki Bahin Yojana September 2026 installment update)
राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी राजाही संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारकडून आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरही सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे.
राज्यातील लाभार्थी महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र जमा होतील, अशी आशा होती. पण सरकरकडून फक्त एकाच महिन्याचा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येतील, अशीही चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला, पण अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शेतकऱ्यांना केली जाणारी मदत आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता.... या दोन्ही हप्त्यामुळे सरकारपुढे आर्थिक संकट उभं ठाकले असू शकते. त्यामुळेच ऑक्टोबरचा हप्ता प्रलंबित राहिलाय.
सप्टेंबर महिन्याचे १५०० खात्यावर जमा होत आहेत. पण ऑक्टोबर महिन्याच्या सन्मान निधीचे काय? असा सवाल विचारला जात आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ऑक्टोबरचा सन्मान निधी दिला जाऊ शकतो. २५ ते २८ नोव्हेंबर या काळात ऑक्टोबर महिन्याचे १५०० रूपये खात्यात येऊ शकतात. याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या फक्त सप्टेंबर महिन्याचाच हप्ता जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तुमच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचे १५०० जमा झाले का?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यावर आला की नाही... कसे तपासाल?
तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर बँकेकडून मेसेज येतो. बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर "Credited with Rs. 1500" किंवा "DBT Credit" असा मेसेज आला आहे का, ते मेसेज बॉक्समध्ये तपासा.
जर तुम्ही मोबाईलवर UPI ॲप्स वापरत असाल, तर तिथून लगेच बँक बॅलन्स पाहू शकता. PhonePe, Google Pay किंवा Paytm उघडा. 'Check Bank Balance' किंवा 'Balance & History' या पर्यायावर क्लिक करा. तुमचा UPI PIN टाका.बँक बॅलन्स तपासून स्टेटमेंटमध्ये १५०० रुपये जमा झाले आहेत का, ते पाहा.
मोबाईलमधील 'Nari Shakti Doot' किंवा अधिकृत लाडकी बहीण ॲप उघडा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा. 'यापूर्वी केलेले अर्ज' (Applied Applications) किंवा 'Form Status' वर जा. तिथे तुमच्या अर्जाची स्थिती (Approved) आणि हप्त्याचे पेमेंट स्टेटस (Payment Status) तपासा.
तुमच्या बँकेच्या टोल-फ्री नंबरवर नोंदणीकृत मोबाईलवरून मिस्ड कॉल देऊन बॅलन्सचा मेसेज मिळवू शकता. जवळच्या बँकेत जाऊन किंवा 'मायक्रो एटीएम / सीएससी केंद्र' (CSC Center) मध्ये जाऊन पासबुक प्रिंट करून घेऊ शकता.
योजनेचे पैसे थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा होत होतो. Google वर pfms.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 'Know Your Payments' किंवा 'DBT Status' वर क्लिक करा. तुमची बँक निवडा आणि बँक खाते क्रमांक (Account Number) प्रविष्ट करा. स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड (Captcha) टाकून सर्च करा; पैसे जमा झाल्याची माहिती दिसेल.
तुमचे बँक खाते आधार कार्डशी (Aadhaar Seeded) लिंक असणे आणि DBT पर्याय सुरू असणे आवश्यक आहे. जर स्टेटस 'Approved' असूनही पैसे आले नसतील, तर तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.