Ladki Bahin Yojana Update Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Maharashtra Scheme: ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाडकी बहिणींना तात्काळ हप्ता मिळणार नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या स्पष्टीकरणानुसार ३१ मार्चनंतरच अंतिम मान्यतेनंतर रखडलेले पैसे बॅंक खात्यात जमा होतील.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भारतीय महिलांना आत्तापर्यंत झाला आहे. काही लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी आल्या होत्या. काहींना लाडक्या ई-केवायसी करता आली नव्हती. म्हणून पुन्हा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये आता ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांनी आत्तापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली त्यांना पुढील हप्ता बॅंकेत कधी जमा होणार? असा प्रश्न पडला आहे. यावर महिला बालकल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे. याने महिलांना स्वावलंबी बनवणं, तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा योजनेमागचा उद्देश आहे. पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाहीये. याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी. त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रखडलेले आहेत. महिलांना या योजनेचा लाभ होत नाहीये.

राज्य शासनाने हा लाभ इतरांपर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रीया सुरु केली आहे. त्यामध्ये महिला लाभार्थीचा आधार क्रमांक, बॅंकेचे खाते, मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जाते. मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागात अडचणी येत आहेत. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक त्रुट्या, आधार-बॅंक लिंक नसणे, ओटीपीत अडथळे अशा अडचणींमुळे महिला नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर ई- केवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. याचा शेवट ३१ मार्च असणार आहे.

ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांचे पैसे एकत्र जमा होतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावर महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी झाली आहे. त्यांच्या मते, ज्या महिलांची ई-केवायसी पुर्ण झाली आहे. त्याच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल. मग रखडलेले हप्ते त्यांच्या बॅंक खात्यात दिले जाणार आहेत. तात्काळ पैसे मिळणार नाहीत. ३१ मार्चनतंरच हप्ता देण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी प्रतिक्षा करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी

Influencer Accident:'बिग बॉस' फेम इन्फ्लुएंसरचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचा अक्षरश: चुराडा

महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pitla Bhakri Recipe: जेवण करायचा कंटाळा आलायं? मग घरी झटपट कमी गॅसमध्ये बनवा झणझणीत पिठलं भाकरी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT