Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: २७ लाख 'लाडकी'च्या घरी पोहचणार अंगणवाडीच्या ताई, कोणते प्रश्न विचारणार? वाचा पडताळणीचे निकष

Majhi Ladki Bahin Yojana Reverification Process: लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. यावेळी अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार छाननी

या निकषांवर होणार पडताळणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. योजनेत जवळपास लाखो महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या महिलांची आता छाननी केली जाणार आहे. दरम्यान, या पडताळणीचे निकष काय असणार आहे, कोणत्या आधारावर ही पडताळणी होणार आहे त्याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.

लाडक्या बहि‍णींच्या पडताळणीचे निकष, अंगणवाडी सेविका काय प्रश्न विचारणार?

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे वय २१ ते ६५ वर्ष असावे. जर जास्त वय असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे.

  • इतर सरकारी योजनांचा म्हणजे संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना याशिवाय इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्या अर्जांची पडताळणी होणार आहे.

  • एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे.

  • ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहेत त्यांचाही लाभ आता बंद केला जाणार आहे.

  • आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे.

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांचा लाभ पूर्णपणे बंद जाणार आहेत. जवळपास २६ लाख ३४ हजार लाडक्या बहि‍णींच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन प्रश्न विचारणार आहेत. त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत त्यानंतर या सर्व महिलांनी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात दिले जाणार आहेत. त्यानंतर तुमचा लाभ बंद केला जाईल.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत?

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. वय २१-६५ वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहिन योजनेसाठी कोण पात्र नाही?

एकत्रित वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹२,५०,०००/- पेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील सदस्य हा करदाता आहे तर त्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

Chhagan Bhujbal: आरक्षण जीआरमुळे भुजबळ नाराज, मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

SCROLL FOR NEXT