Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ०३ सप्टेंबर २०२५, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश, काही मागण्यांना मान्य, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

ST Mahamandal: शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येणारी महामंडळाची बस पलटली...

वाल्हेरीहून तळोदा च्या दिशेने जाणाऱ्या महामंडळ बसचा अपघात....

अपघातात बसमधील 25 ते 30 विद्यार्थी जखमी...

त्यातील तीन विद्यार्थी गंभीरित्या जखमी....

जखमी विद्यार्थ्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आला दाखल.....

घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल....

भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी निमित्ताने पंढरीत हजारो भाविकांची गर्दी

भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी आज पंढरीत हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणामार्ग, यासह चंद्रभागानदी परिसर हजारो भाविकांनी गजबजुन गेली आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतो आहे.

विठ्ठल रूक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग दोन किलोमीटर पर्यंत गेली आहे.

सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

सोन्याचे दर

आज जळगावातील सराफा बाजारातील सोन्याचे दर

22k 96720

24k 105600

Silver 124000

Amravati: अमरावती जिल्ह्यातील बोरगाव सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील बोरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनल ने 13 पैकी 13 जागा जिंकून जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली आहे.. यामध्ये शिंदे गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सभापती आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली असून त्यांनी एक हाती सत्ता या सोसायटीवर मिळविली, व गावात गुलाल उधळत एकच जल्लोष करण्यात आला.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी त आता शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात सुद्धा दमदार एन्ट्री करेल,ही आता सुरुवात झाली आहे, असेही यावेळी या विजयी उमेदवारांनी बोलून दाखवले...

Nashik: नाशिकमध्ये मराठा संघटनांकडून जल्लोष

- जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नंतर जल्लोष

- नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित

- नाशिकचे ग्राम दैवत असलेल्या कालिका मातेची आरती करून जल्लोष

मुंबईवरून गावाकडे परतणाऱ्या मराठा बांधवांसाठी नाश्त्याची आणि चहाची सोय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्याने अनेक मराठा बांधव मुंबईवरून गावाकडे परतत आहे. याच मराठा बांधवांसाठी जालन्यातील रामनगर येथील मराठा बांधवांनी नाष्टा आणि चहाची व्यवस्था केली आहे. जालन्यातील रामनगर येथील ग्रामस्थांकडून जवळपास 15 क्विंटल चिवड्याचे वाटप करण्यात येत आहे.

असीम सरोदे यांनी पुणे पोलिस महानगरपालिका आयुक्त यांना पाठवलं पत्र

असीम सरोदे यांनी पुणे पोलिस महानगरपालिका आयुक्त यांना पाठवलं पत्र

पुणे महापालिका आकाशचिन्ह विभाग आणि पुणे पोलीस यांना प्रबोधन चित्राचे बॅनर/होर्डिंग लावण्याची परवानगी मागितलेली आहे

१५ बाय २५ फुटाचे होर्डिंग्ज गणपती उत्सव काळात डेक्कन येथील गुडलक चौकात बॅनर लावण्याची परवानगी मागितली

लोकशाही आणि लोकशाहीचे पारदर्शक प्रक्रिया या संदर्भात काढलेले एक चित्र लावणार आहोत

Sion-Panvel: सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी

तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगात रांगा

मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

सायन पुणे महामार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे

आज सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे वाहन चालकांना

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान मुळशीत युवक बुडाला

काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, पिरंगुट- हिंजवडी मार्गावरील भरे पूल येथे मुळा नदीच्या किनारी ही दुर्घटना घडली.

हा मुलगा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता.मित्रांसोबत खोल पाण्यामध्ये गेला होता.त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांनी डुबकी मारली व तो तसाच नदीच्या पात्रामध्ये वाहत खाली गेला

लक्ष्मण हनुमंत चव्हाण असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.तो मूळचा उदगीर तालुक्यातील असून सध्या तो पिरंगुट येथे राहत होता. त्याचा शोध आपत्ती व्यवस्थापन समितीने घेत असताना संध्याकाळ झाल्याने शोध थांबवण्यात आला.

आज सकाळपासून या बुडलेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.

अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

काल पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तसेच रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाचा आज सकाळी पुन्हा शोध घेतला जात आहे.

Parbhani: परभणीच्या येलदरी प्रकल्पाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले

मराठवाड्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे पुन्हा एकदा १० पैकी ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.६ दरवाज्यांमधून १२६६० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि खडकपुर्णा धरणातील विसर्गामुळे येलदरी तून पाण्याचा विसर्ग केला जातोय जर पाऊस वाढला तर विसर्ग ही वाढवण्यात येवू शकतो.

फुलांची आवक घटली, निशिगंधा हजार रूपये किलो तर गुलाब चारशे रुपये शेकडा

जळगाव राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुलांच्या शेतीवर मोठा परिणाम झाला असून, ऐन गणेशोत्सवाच्या काळात बाजारात फुलांची आवक लक्षणीय घटली आहे. यामुळे फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे, सरकारने कृत्रिम फुलांवर बंदी घातली असली तरी, बाजारात त्यांची विक्री जोरात सुरू आहे. जळगावच्या बाजारात झेंडू, गुलाब, मोगरा आणि निशिगंधा याच फुलांची आवक आहे. चाफा, सोनचाफा आदी फुले बाजारात नाहीत.

कुर्डुवाडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याची शपथ

पंढरपूर जवळच्या कुर्डुवाडी शहरातील गणेश तरुण मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा आगवेळा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तशी शपथ घेतली आहे. डीजेमुळे ध्वनी प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे.अशा प्रकारचा निर्णय घेणारे हे मंडळ सोलापूर जिल्ह्यात पहिले ठरले आहे.

Buldhana: बुलढाण्यातील येळगाव धरण 100 टक्के भरले

बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शहराची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे येळगाव धरणाच्या गोडबोले सांडव्यातून विसर्ग व्हायला लागला आहे. येळगाव धरणातून बुलडाणा शहरासह तालुक्यातील काही 13 गावांना पाणीपुरवठा केला जातो. पुढील एका वर्षासाठी बुलडाणा तसेच लगतच्या गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलीय. येळगाव धरणात जवळपास 100 टक्के जलसंचय झाला आहे .. बुलडाणा शहरातील लोकसंख्येचा विचार केला असता शंभर लिटर प्रमाणे दररोज एक कोटी लिटर्स पेक्षा जास्त पाण्याची गरज शहरवासियांना आहे. तर येळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुण या गावांना यळगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. याधरणातून दररोज सव्वा कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्याची उचल केल्या जाते . धरणाची पाणी साठवण क्षमता 12.40 दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुफलाम झाला आहे.

मेळघाटमधील बारू गावातील तलावाचा बांध फुटला

मेळघाट मधील धारणी तालुक्यातील बारू गावातील सिंचन विभागाच्या तलावाची भिंत फुटल्यामुळे मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.या पाण्यामुळे बारू–बीजू धावडी हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.तर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे... या दुर्घटनेमुळे बारू, बीजू धावडी, ढाकणा, अकोट व परतवाडा मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.हा 1977-78 मध्ये बांधण्यात आला होता. त्याची दुरुस्ती 2013-14 मध्ये करण्यात आल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र 2014 पासून या तलावाची देखभाल न केल्याने अखेर हा तलाव अखेर फुटला आहे,याचा त्रास मात्र मेळघाट मधील नागरिकांना सहन करावा लागत आहे

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह त्र्यंबकेश्वरला १० हेलिपॅड होणार

- तर नाशिक विमानतळावरील विमानांचं पार्किंग देखील ५ वरून ८ वर

- नाशिकला ५ तर त्र्यंबकेश्वर परिसरात ५ हेलिपॅड उभारण्यासाठी जागा निश्चित

- परिसरातील शिक्षण संस्थांचे हेलिपॅडदेखील वापरण्याचा प्रशासनाचा विचार

- नाशिक आणि ओझर होऊन हेलिकॉप्टरने थेट त्रंबकेश्वरला जाता येणार

- १८५ कोटींचा आराखडा केंद्रीय उड्डयन मंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला

- १५० कोटी रुपये खर्चून विमानतळ इमारतीचा देखील केला जाणार विस्तार

Solapur: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

- विषबाधा झालेल्यांपैकी 17 लोकांवर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती

- प्रशिक्षणार्थी पोलीसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय

- सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेय

- पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

- दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास सुरू झाला

- त्यानंतर जवळपास 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले

Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर बंदी

- कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई, नाशिक पोलिस प्रशासनाचा इशारा

- डीजे आणि लेझरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्यानं निर्णय

- पोलिस ठाणे निहाय ध्वनी क्षेपकांच्या आवाजाचं डेसीबल देखील मोजलं जाणार

- विसर्जन मिरवणुकीतील गर्दीवर देखील असणार पोलिसांचा वॉच

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध , रायगड जिल्ह्यातून एसटीच्या जादा बसेसची सोय

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या कोकण वासियांना पुन्हा मुंबईत परतायचे वेध लागलेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 3 सप्टेंबर रोजी 525 तर उद्या 4 सप्टेंबरला 125 जादा गाड्या रायगडमधील आठ आगारातून सोडण्यात येणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येतील असे एसटी तर्फे सांगण्यात आले.

प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस , शेवटचे दोन दिवस शिल्लक

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.

गेल्या १० दिवसात केवल ५९५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. पण एका दिवसात त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त हरकतींचा पाऊस आज पडला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२२ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर ४ सप्टेंबर पर्यंत यावर हरकती सूचना नोंदविण्याची मुदत आहे.

यासाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या कार्यालयासह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने निवडणुकीसाठी मागितले १७ मुख्य निवडणूक अधिकारी

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या ४ सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहेत.त्यातच पालिकेच्या निवडणूक कार्यालय निहाय निवडणुकीसाठी १७ मुख्य निवडणूक अधिकारी आणि ३४ सहायक निवडणूक अधिकारी देण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली

पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रभागनिहाय निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबईमधून निघाल्यानंतर जरांगे पाटील थेट संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

जरांगे पाटील यांच्यावर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू

मध्यरात्री जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत

रुग्णालयाबाहेर मराठा तरुणांची स्वागतासाठी मोठी गर्दी

मध्यरात्री तरुणांकडून फटाके फोडत पाटलांचे स्वागत

गणपती व सारथी उंदराचा घरात चालू असलेला गोंधळाचा देखावा

यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे तयार करण्यात आला आहे.अशातच यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील सुभाष नगर येथील सुमित रवींद्र टाके या युवकाने घरी पार्वती माता नसताना गणपती आणि उंदराच्या घरात चालू असलेल्या गोंधळाचा देखावा तयार केला असून हा देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे अशातच जुनी भांडी चूल व उंदरांच्या मस्त्या हुबेहूब साकारले असून हा देखावा तयार करण्यासाठी सुमितला पंधरा दिवसांचा वेळ लागला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सुमितच्या डोक्यात आगळावेगळा काहीतरी देखावा तयार करण्याचा विचार सुरू होता अशातच त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून साहित्य जमा करीत हा देखावा तयार केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश; उमरगा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष

मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसापासून मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव च्या उमरगा शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.या वेळी जय जिजाऊ,जय शिवराय,एक मराठा लाख मराठा च्या गजरांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

तुळजाभवानी मातेला चंद्रग्रहनावेळी सोवळ्यात ठेवणार, रवीवारी राञी विधीच्या वेळेत बदल

चंद्रग्रहनाच्या पाश्र्वभूमीवर 7 सप्टेंबर रोजी रवीवारी राञी तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.यामध्ये रवीवारी राञी ९.५७ ते १.३० या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. रवीवारी राञी चंद्रग्रहन असल्याने ग्रहनकालावधीत रवीवारी देवीचे नित्योपचार धार्मिक पुजा विधीत बदल करण्यात आला आहे.तसेच ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता नित्यपुजेची घाट होऊन अभिषेक पुजेला प्रारंभ होणार आहे.अभिषेक पुजा विधीनंतर देवीस महावस्त्र अलंकार घालण्यात येवून धुपारती होईल विशेष म्हणजे रवीवारी राञभर मंदीर खुले राहणार आहे.

अंबरनाथमध्ये मुस्लिम तरुणाच्या हातून बाप्पाचं विसर्जन!

अंबरनाथमधील बबलू खान हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी मंगळवारी सात दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनात सहभागी होत गणेशमूर्तींचं विसर्जन केलं. कानसई परिसरात माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात बबलू खान यांनी बाप्पांचं विसर्जन केलं. यावेळी आमची ईद, तसा हिंदूंचा गणेशोत्सव, असं म्हणत सर्वांनी जात धर्म न मानता एकमेकांच्या सणात सहभागी व्हायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. तर त्यांच्या या कृतीचं माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी देखील कौतुक केलं.

-मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना यश, मराठा बांधवांनी नांदेडमध्ये केला जल्लोष.

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केले आहेत. मागण्या संदर्भात राज्य शासनाने तसा जीआर देखील काढला आहे.जीआर काढल्यानंतर आणि मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला.नांदेड मध्ये देखील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी एकत्रित येत जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत मराठा बांधवांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com