Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लाभार्थी महिलांना कदाचित केवायसीसाठी मुदतवाढ मिळू शकते.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का?

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला निवडणुकांमध्ये खूप फायदा झाला. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये पडताळणीपासून ते केवायसीपर्यंतच्या निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत सरकार आणखी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार? (Ladki Bahin Yojana KYC Deadline Extension)

लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी १८ नोव्हेंबर म्हणजे उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.सध्या राज्यात २.३५ कोटी महिला लाभ घेत आहेत. यातील १.३ कोटी महिलांनी केवायसी केली नसल्याचे समोर आले आहेत.

लाडकी बहीण योजनेतील केवायसीाठी आता मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. जर केवायसी केले नाही तर १ कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.यामुळेच महिलांना केवायसीसाठी मुदतवाढ देण्याच्या विचारात सरकार आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जर केवायसीसाठी मुदतवाढ दिली नाही आणि कोट्यवधी महिलांचे लाभ बंद झाले तर हे सरकारला परवडणारे नाही. निवडणुकांच्या काळात सरकार कोणतीही कठोर पाऊले उचलणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी एक महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी महिलांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लागते. दरम्यान, ज्यांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता या महिलांसाठी वेबसाइटवर नवीन सेक्शन तयार केले जाणार आहे. यामार्फत महिलांना केवायसी पूर्ण करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Maharashtra Live News Update: अकलूजमध्ये तिरंगी लढत; मोहिते पाटीलविरुध्द भाजप सामना

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

ठरलं तर मग! तेजस्वी यादव विरोधी पक्षनेता, आरजेडीच्या बैठकीत मोठा निर्णय

Migraine Relief: मायग्रेनचा त्रास वाढलाय? मार्केटमध्ये आलीये नवीन गोळी, झटक्यात मिळेल आराम

SCROLL FOR NEXT