App Based Taxi And Rickshaw Service saamtv
बिझनेस

Government Taxi Service: राज्यात लवकरच सुरू होणार सरकारी रिक्षा-टॅक्सी सेवा; Ola, Uber ला देणार टक्कर

App Based Taxi And Rickshaw Service : महाराष्ट्र सरकार परवडणारी वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी सरकारी टॅक्सी आणि ई-बाईक अशी वाहनसेवा सुरू करणार आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र सरकारकडून नवीन प्रवासी सेवा अॅपवर आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईकसाठी सुरू करण्याचा विचार

  • जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री अशी संभाव्य नावे चर्चेत

  • ओला-उबरला टक्कर देणारी सरकारी सेवा लवकरच

  • तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा पुढाकार

राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार नवीन योजना सुरू करत आहे. राज्य सरका अॅपवर आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाहीये. सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या ॲप ला जय महाराष्ट्र, महा - राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देण्यात येईल. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलीय. (State-Owned Cab Service to Compete with Ola and Uber in Maharashtra)

सरकार वाहनसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात आलाय. त्यांच्या मंजुरीनंतर हे अॅप लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केलाय. या उपक्रमाअंतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आलीय.

यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अ‍ॅप तयार केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार ॲपची नियमावली अंतिम टप्यात असल्याचं मंत्री सरनाईक म्हणालेत.

या योजनेच्या माध्यामातून मराठी तरुण-तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार असल्याची माहिती मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलीय. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिले जाणार आहे.

दरम्यान खासगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करत आहेत. सरकारकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्याने शासनाने असे ॲप विकसित केले तर त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होणार आहे. या संदर्भात ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ॲप निर्मितीचे तंत्रज्ञ व शासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्र सरकार कोणती नवीन सेवा सुरू करत आहे?

महाराष्ट्र सरकार अॅपवर आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

या सेवेमुळे कोणाला रोजगार मिळणार आहे?

या नवीन सेवेमुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

या सरकारी अॅपचे संभाव्य नावे कोणती आहेत?

या अॅपसाठी जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री किंवा महा-गो अशी नावे विचाराधीन आहेत.

या सेवेमुळे कोणत्या खासगी कंपन्यांना स्पर्धा मिळणार आहे?

ओला आणि उबर यांसारख्या खासगी प्रवासी सेवांना या सरकारी सेवेमुळे स्पर्धा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horocope Thursday : उद्याचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! वाचा राशीभविष्य

Dosa Making Tips: डोसा तव्यावर चिकटतो? वापरा 'या' सिंपल टिप्स, डोसा अजिबात चिकटणार नाही

Pune News: “तुम्ही रोहिंग्या आहात, इथून निघून जा”; कारगिल वीराच्या घरात टोळक्याचा हल्ला, पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

Ladghar Beach : अथांग पसरलेला 'लाडघर' समुद्रकिनारा, कोकणातील सीक्रेट बीच

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

SCROLL FOR NEXT