Ola, Uber and Rapido rides in Maharashtra to follow government-fixed fare policy saam tv
बिझनेस

OLA, Uber आणि Rapido च्या मनमानीला ब्रेक; सरकार ठरवणार रेट, जाणून घ्या नवे भाडेदर

Ola, Uber and Rapido Rate: महाराष्ट्रातील राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) मुंबई महानगर प्रदेशात बाईक टॅक्सी सेवांसाठी अॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला, उबर आणि रॅपिडोच्या मूळ कंपन्यांना तात्पुरते परवाने देण्यास मान्यता दिलीय.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र सरकारने ओला, उबर आणि रॅपिडोच्या भाड्यावर नियंत्रण आणले.

  • एमएमआरटीएकडून सरकारी दरांनुसारच भाडे आकारण्याचे आदेश जारी झाले.

  • चालकांना एकूण भाड्याच्या ८०% वाटा मिळणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) सर्व अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांना जसे की, ओला, उबर, रॅपिडो आणि इतरांना सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसार भाडे आकारण्याचे निर्देश दिले होते. राज्यात 'अ‍ॅग्रीगेटर धोरण' लागू होईपर्यंत सरकारने आकारलेल्या दरानुसार भाडे घेण्याच्या सूचना एमएमआरटीएकडून देण्यात आल्या होत्या.

तसेच एकूण भाड्याच्या ८०% वाटा चालकांना देणे बंधनकारक करण्यात आले होते. या आदेशानंतर आता कॅब चालकांनी सरकारच्या या आदेशाचे पालन करण्याचा आणि प्रवाशांकडून सरकारी दर आकारण्याचा निर्णय घेतलाय.

दुसरीकडे, अ‍ॅग्रीगेटर कंपन्या त्यांच्या सेवा 'मागणी आणि पुरवठा' या जुन्या पद्धतीनुसार चालवत आहेत. दरम्यान १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून हा सरकारी आदेश लागू झाला. या आदेशात काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी प्रति किमी भाडे २०.६६ रुपये आणि कॅबसाठी २२.७५ रुपये निश्चित करण्यात आलेत.

रविवारी गिग वर्कर्स असोसिएशनने चालकांना २३ सप्टेंबरपासून प्रवाशांकडून निश्चित भाडे आकारण्याचे निर्देश दिले. अद्याप कोणत्याही अ‍ॅग्रीगेटर कंपनीने या मुद्द्यावर प्रतिसाद दिलेला नाहीये. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुमारे ९०% कॅब चालक गिग असोसिएशनच्या मागण्यांशी सहमत आहेत. गुरुवारी,असोसिएशनने आझाद मैदानावर आंदोलन केलं. ऑटो, टॅक्सी आणि कॅब सेवांचे भाडे सरकारच्या मानकांनुसार समायोजित करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र सरकारने २० मे २०२५ रोजी अ‍ॅग्रीगेटर धोरणाला मंजुरी दिली होती. यात विनाकारण राईड्स रद्द केल्याबद्दल चालक आणि प्रवाशांवर दंड आकारणे, भाडे मर्यादा घालणे आणि कार पूलिंग सेवांसाठी कठोर नियम समाविष्ट आहेत. अ‍ॅग्रीगेटर कंपन्या महाराष्ट्रात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हे धोरण अद्याप लागू झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Fire : कांदिवलीतल्या चाळीत अग्नि तांडव, ७ जण होरपळले, गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे उडाला भडका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आधार कार्डशिवाय ₹१५०० विसरा, e-KYC करण्याआधी वाचा

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

SCROLL FOR NEXT