Mom’s Magic Pickle Saam Tv
बिझनेस

Mom’s Magic Pickle नं चाखली यशाची चव; फक्त ४००० रुपयांपासून व्यवसायची सुरूवात, आज दरमहा अडीच लाखांची कमाई

Pickle Business Success Story : आई ज्याप्रमाणे लोणचं बनवायची तेच कौशल्य आत्मसात करत सरोज प्रजापती यांनी लोणचे बनवण्याचा व्यवसाय वयाच्या ४८ वर्षी सुरू केला. यात त्यांना त्यांच्या मुलाने साथ दिली. लोणचे बनवण्याचा व्यवसाय करावं, ही आयडिया त्यांना कशी सुचली? लोणचे बनवण्याचा व्यवसाय इतका यशस्वी का झाला याची माहिती आपण या लेखात घेऊ.

Bharat Jadhav

Success Business Story,Mom’s Magic Pickle :

अनेकांचं व्यवसाय करण्याचं स्वप्न असतं. परंतु कोणता व्यवसाय करावं आणि तो कशाप्रकारे सुरू करावं हे कोडं अनेकांना सुटत नाही. बहुतेकजण व्यवसाय क्षेत्रात उडी घेतात परंतु नफा करून घेण्याऐवजी कर्जबाजारी होत असतात. व्यवसाय करण्यासाठी संयम आणि योग्य रणनीती असणं आवश्यक असते, जी योजना मध्य प्रदेशमधील 'मॉम्स मॅझिक पिकल' याचा व्यवसाय सुरू करणाऱ्या सरोज प्रजापती आणि त्यांचा मुलगा अमितने आखली.(Latest News)

सरोज प्रजापती आणि त्यांचा मुलगा अमित प्रजापतीने सुरू केलेल्या लोणचं बनवण्याच्या व्यवसायाविषयी जाणून घेऊ. सरोज प्रजापती ह्या मध्य प्रदेशातील अशोक नगरमध्ये राहतात. लोणचं बनवण्याचा व्यवसायाने आज यशाची चव चाखलीय. त्यांना त्यांच्या या व्यवसायात यश कसं मिळालं याची माहिती घेऊ.

टीव्ही बघून काय होतं असं कोणी म्हणत असेल तर त्यांना सरोज आणि त्यांचा मुलगा अमित प्रजापती याचं उदाहरण द्या. सरोज आणि त्यांचा मुलगा टीव्हीवर शार्क टॅक इंडिया हा कार्यक्रम पाहत होते. त्यावेळी त्यांना लोणचं बनवण्याच्या व्यवसायाची माहिती मिळाली. कार्यक्रम बघताना या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यानंतर दोघांनी हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. या दोघांना व्यवसायातील नस सापडली आणि ते यशस्वी व्यवसायीक झाले. कधीही शाळेत न गेलेल्या सरोज प्रजापती आज यशस्वी उद्योजिका झाल्या. त्या गावातील ३० महिलांना रोजगार देताच शिवाय महिन्याकाठी तब्बल अडीच लाख रुपायंची कमाई या व्यवसायातून करतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्पनेला मार्केटिंगची जोड

सरोज प्रजापती यांचा मुलगा हा ब्रँड बिल्डिंग आणि डिजिटल मार्केटिंगची एजन्सी चालवतो. वयाच्या १९ वर्षी अमित प्रजापती याने जून २०२३ मध्ये मॉम्स मॅजिक पिकल इंडिया या ब्रँडच्या नावाखाली सोशल मीडियावर एक जाहिरात मेसेज पोस्ट केला. त्या पोस्टवरून त्यांना लोणचं बनवून देण्याच्या ऑर्डर मिळून लागल्या. आई सरोज लोणचं बनवत आणि त्याची पॅकिंग करत. त्यानंतर अमित त्यांना ब्रँड आणि लेबल लावून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करायचा. अस करत-करत काही महिन्यातच त्यांच्या व्यवसायाने मोठी भरारी घेतली. त्यांनी एक मोठी जागा घेत तेथे लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी सरोज यांनी ३० महिलांना नोकरीवर ठेवलं.

कधीही शाळेत न जाणाऱ्या सरोजसाठी उद्योजिका होणं ही गौरवाची बाब आहे. वयाच्या ४३ व्य वर्षी सरोज यांनी यशस्वी व्यवसाय चालवत आहेत. सरोज ह्या महिन्याला ८०० किलो लोणच्याची विक्री करतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी सात महिन्यातच कमाईचा मोठा आकडा पार केला. सरोज ह्या लोणचं विकून महिन्याकाठी तब्बल २.५० लाख रुपयांची कमाई करतात.

काय म्हणाल्या सरोज प्रजापती

आपल्या बिझनेसविषयी सरोज प्रजापती म्हणाल्या की, त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बेरखेडी गावात झाला होता. एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आई-वडील शेतकरी होते. परिस्थिती हलाकीची होती, त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या फारशा संधी नव्हत्या. लहानपणी त्यांनी आईला लोणचं बनवताना पाहिलं होतं. तिच्या आईकडे लोणचं बनवण्याचं विशेष कौशल्य होतं. सरोज यांनी तिच कौशल्य वापरत लोणचं बनवण्यास सुरुवात केली. आईकडून लोणचं बनवण्याचं कौशल्याने आज एक यशस्वी व्यवसाय उभा राहिल्याने आनंद वाटत असल्यांच त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती युगेंद्र पवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT