LPG Gas Cylinder New Rate : अर्थमंत्रि निर्मला सितारमन आज २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचं याकडे लक्ष लागलेय. पण त्याआधीच एक दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ७ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून किंमती लागू करण्यात आल्या आहेत.
२०२५ वर्षाच्या दुसर्या महिन्यातही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. आता दिल्लीमध्ये व्यवसायिक गॅसची किंमत १७९७ रूपये इतक्या रुपयांना मिळणार आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत.
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली. IOCL च्या संकेतस्थळानुसार, १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये 1749.50 रूपयांना मिळणार आहे. कोलकात्यामध्ये १९०७, चेन्नईमध्ये १९५९.५० रूपयांनी सिलिंडर मिळेल. याआधी एक जानेवारी २०२५ रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. तर डिसेंबर २०२४ मध्ये गॅस सिलिंडरच्या दरात १४ रूपयांनी वाढ करण्यात आली होती.
घरगुती १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय. त्यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयांची सबसिडी मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.