LPG Price Hike Saam Tv
बिझनेस

LPG Price Hike: टेन्शन वाढवणारी बातमी! एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

Nagpur Go Gas LPG Gas Price Hike: एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये वाहनांमध्ये भरणाऱ्या एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसच्या किंमती वाढत आहेत.

Siddhi Hande

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना फटका

एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या

नागपूरात एलपीजीच्या किंमती ८ रुपये ४२ रुपयांनी वाढल्या

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम जगावर होताना दिसत आहे. याचाच फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. युद्धामुळे गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. त्यानंतर गो गॅसने नागपूरमध्ये आपल्या LPG स्टेशनवर वाहनांत लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांनी दरात वाढ केली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने आता वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

आज नागपूरमध्ये (Nagpur LPG Gas Price) एलपीजी गॅसच्या किंमती ६४ रुपये ९८ पैसे झाले आहेत. स्कूल बस व स्कूल व्हॅनला गो गॅस 12 रुपये प्रति लिटर सबसिडी दराने LPG गॅस पुरवत होते . आता ही सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी हे दर ही थेट 20 रुपयांनी वाढले आहे.

अनेक ऑटो रिक्षा हे नागपुरात एलपीजीवर चालतात. त्यामुळे यांनादेखील फटका बसणार आहे. कुठेतरी भाडेवाढ होईल, अशी अपेक्षा रिक्षाचालकांना होती. त्यातच आता एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना खिशाला फटका बसणार आहे. (Nagpur Go Gas LPG price Hike)

अनेक वाहने, रिक्षा, बस या एलपीजी गॅसवर चालतात. या वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनात भरणारा एलपीजी गॅस हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा होता. मात्र, आता या किंमतीतदेखील वाढ झाल्याने थेट सर्वांनाच फटका बसणार आहे. रिक्षा, बस, कारने रोज प्रवास करणाऱ्यांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम होणार आहे. जर इराण-इस्त्रायल युद्ध असेच सुरु राहिले तर या किंमती अजूनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT