LPG Gas Google
बिझनेस

LPG Gas: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! LPG गॅसच्या किंमती वाढल्या, तुमच्या शहरातील दर किती?

LPG Gas Cyliner Price Hike: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. एलपीजी गॅसच्या सिलिंडरमध्ये वाढ झाली आहे.

Siddhi Hande

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. मार्च महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होत असतात. दरम्यान या महिन्यात किंमती वाढल्याने आता सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. १ मार्च २०२५ पासून १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहे.कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जो सिलिंडर आधी फक्त १७९७ रुपयांना मिळायचा. त्याच्या किंमती वाढून १८०३ रुपये झाल्या आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले आहे. मार्च महिन्यात अनेक सण आहेत. होळी, ईदच्या महिन्यात सिलिंडर महाग झाले आहे. उद्यापासून रमझान सुरु होणार आहे. अशातच कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये हे भाव वाढले आहेत. (LPG Gas Cylinder Price)

तुमच्या शहरातील एलपीजी गॅसचे दर

मुंबईत याआधी एलपीजी गॅसच्या किंमत १७४९.५० रुपये होत्या. आता या गॅसची किंमत १७५५.५० रुपये झाली आहे. दिल्लीत एलपीजी गॅसच्या किंमत १७९७ रुपयांवरुन १८०३ रुपये झाल्या आहेत. चेन्नईत एलपीजी गॅसच्या किंमती १९५९ रुपयांवरुन वाढून १९६५ झाल्या आहेत.

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल नाही

कमर्शियल गॅसच्या किंमतीत बदल झाला असाल तरीही घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गृहिणींच्या महिन्याच्या बजेटवर फार कोणताही बदल होणार नाही. परंतु कमर्शियल गॅसच्या किंमतीतील बदलांचा परिणाम हा हॉटेलच्या बिलावर होऊ शकतो. हॉटेलच्या बिलांच्या किंमतीत कदाचित वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

Maharashtra Tourism : बॅग भरा अन् ट्रेकला चला, भावंडांसोबत भाऊबीजेला 'येथे' ट्रिप प्लान करा

Jio Diwali Offer: आली दिवाळी...जिओकडून २% मोफत सोने आणि १० लाखांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT