Ankush Dhavre
ताज हॉटेलची स्थापना १६ डिसेंबर १९०३ रोजी झाली.
हे हॉटेल टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी बांधले.
ताज महाल पॅलेस हॉटेल हे मुंबईतील कुलाबा येथे आहे.
जमशेदजी टाटा यांना एका ब्रिटिश हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी ताज हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला.
हे हॉटेल भारतातील पहिले लक्झरी हॉटेल मानले जाते.
ताज हॉटेलच्या वास्तुशैलीत भारतीय, इस्लामिक आणि युरोपियन डिझाइनचा संगम आहे.
१९७३ मध्ये ताज टॉवर या हॉटेलच्या नवीन इमारतीची भर घालण्यात आली.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते, पण नंतर त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले.
आज ताज हॉटेल हे भारतातील प्रतिष्ठेचे आणि ऐतिहासिक हेरिटेज हॉटेल म्हणून ओळखले जाते.