Ankush Dhavre
ताजमहाल ही जगातील सर्वात सुंदर वास्तु आहे. या वास्तुला प्रेमाची निशाणी असंही म्हटलं जातं
मुघल बादशहा शाहजहांने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत ही वास्तू बांधली होती.
ताजमहालच्या आत मध्यभागी एक भव्य समाधी कक्ष आहे, जिथे मुमताज महल आणि शाहजहान यांची थडगी आहेत. मात्र, प्रत्यक्ष कबरी तळघरात आहेत.
समाधी कक्षाच्या भिंती सफेद संगमरवरी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आणि शिल्पकला कोरलेली आहे.
ताजमहालच्या आत आणि बाहेर कुराणातील आयती कोरलेल्या आहेत, ज्या या स्मारकाच्या धार्मिक महत्त्वाची जाणीव करून देतात.
ताजमहालच्या आत नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी भिंतींवर लहान खिडक्या आणि झरोके बनवण्यात आले आहेत.
सूर्यप्रकाश वेगवेगळ्या कोनातून आत पडतो आणि आकर्षक प्रतिबिंब तयार करतो.
ताजमहालच्या खाली गुप्त तळघर असून त्यामध्ये मुमताज महल आणि शाहजहान यांचे प्रत्यक्ष थडगे आहेत. पर्यटकांना हा भाग पाहता येत नाही.
ताजमहालच्या आतमध्ये एक विशेष प्रतिध्वनी प्रभाव आहे. जर कोणी मोठ्या आवाजात बोलले किंवा गाणे गायले, तर आवाज दीर्घकाळ गुंजतो.