lpg gas update  saam tv
बिझनेस

LPG Gas Update : बंद पडलेले गॅस कनेक्शन पुन्हा कसं सुरू करायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

LPG Gas Connection Update: अनेक वर्षांपासून बंद पडलेले जुने एलपीजी गॅस कनेक्शन रद्द न होता ते 'डी-ॲक्टिव्हेट' झालेले असते. नवीन कनेक्शनसाठी जास्त पैसे आणि वेळ घालवण्याऐवजी तुम्ही तुमचे जुनेच कनेक्शन पुन्हा चालू करू शकता.

Saam Tv

बऱ्याचदा आपण आपले जुने एलपीजी गॅस कनेक्शन अनेक वर्षांपर्यंत वापरत नाहीत त्यामुळे ते बंद होते. अशा परिस्थितीत अनेकदा आपण नवीन कनेक्शन घेण्याचा विचार करू लागतो. परंतु, नवीन कनेक्शन घेण्याऐवजी तुम्ही तुमचे जुनेच गॅस कनेक्शन पुन्हा चालू करू शकता. हे री-ॲक्टिव्हेट करण्याची सोपी प्रक्रिया आणि नियम काय आहेत, ते जाणून घ्या.

कनेक्शन बंद का होते?

तुम्ही सलग 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ एलपीजी सिलिंडर बुकिंग केला नाही, तर सुरक्षेच्या कारणास्तव आणि गैरवापर टाळण्यासाठी गॅस कंपन्या तुमचे खाते 'इन-ॲक्टिव्ह' म्हणजेच बंद करतात.

बंद झालेले एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी या 5 टप्प्यांतील प्रक्रिया जाणून घ्या:

गॅस एजन्सीला भेट देऊन केवायसी फॉर्म भरा

सर्वप्रथम तुमच्या संबंधित एलपीजी गॅस एजन्सीच्या वितरकाकडे जा आणि बंद झालेले कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी री-ॲक्टिव्हेशन फॉर्म / KYC फॉर्म घ्या. या फॉर्ममध्ये तुमचा ग्राहक क्रमांक , नाव आणि सध्याचा पत्ता अचूक भरा.

आवश्यक कागदपत्रे जमा करा

री-ॲक्टिव्हेशन फॉर्मसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची प्रत, राहत्या पत्याचा पुरावा तसेच, जुनी गॅस पासबुक सोबत ठेवा.

बायोमेट्रिक किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करा

एजन्सीमधील अधिकारी तुमच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन करून ई-केवायसी e-KYC प्रक्रिया पूर्ण करतील. पडताळणी झाल्यानंतर तुमचे एलपीजी ग्राहक खाते पुन्हा बँक खात्याशी आणि आधारशी लिंक केले जाईल.

सुरक्षा तपासणी

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक असल्यास गॅस एजन्सीचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन गॅस पाईप, रेग्युलेटर आणि बर्नरची सुरक्षा तपासणी केली जाईल.

कनेक्शन ॲक्टिव्हेट

तपासणी आणि पडताळणी पूर्ण होताच तुमचे जुने एलपीजी कनेक्शन पुन्हा सक्रिय केले जाईल आणि तुम्ही तात्काळ नवीन सिलिंडर बुक करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Juice For Blood Sugar: हे 5 ज्यूस प्या, ब्लड शुगर ना कमी होणार ना जास्त

माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; FIR दाखल करण्याचे कोर्टाने दिले आदेश

Maharashtra News Live Update: कल्याण न्यायालयातील लिफ्ट बंद पडली; दोन वरिष्ठ वकील तासभर अडकले

Salad Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज जेवताना खा सॅलड, मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?

SCROLL FOR NEXT