एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या
भविष्यातदेखील सिलिंडरचे दर आणखी महागण्याची शक्यता
युद्धाचा परिणाम थेट सिलिंडरच्या किंमतीवर होणार
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी महागल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती ११५ रुपयांनी वाढल्या आहेत. आता इंडियन ऑइलने वेबसाइटवर गॅसचे नवीन दर अपडेट केले आहेत.
१४.२ किलोच्या घरगुती गॅसच्या किंमतीत ६० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सिलिंडरची किंमत ८५२.५० रुपयांवरुन ९१२.५० रुपये झाली आहे. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमत ८७९ रुपयांवरुन वाढून ९३९ रुपये झाली आहे. चेन्नईत हे दर ८६८.५० रुपयांवरुन वाढून ९२८.५० रुपये झाले आहेत.
दुसरीकडे व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ११५ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १८८३ रुपये झाली आहे. मुंबईत कमर्शियल गॅस १८३ रुपयांना मिळतो. कोलकत्ता येथे गॅसची किंमत १८७.५० रुपयांवरुन वाढून १९९० रुपये झाली आहे.चेन्नईत १९ किलो वजनाच्या गॅसची किंमती २०४३.५० रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस हे हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टोअरमध्ये वापरला जातो.
का वाढले भाव?
दर महिन्याच्या १ तारखेला व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर करतात. आता ७ मार्चला एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या युद्धाचा हा परिणाम दिसत आहे. यामुळे गॅस सप्लाय कमी झाला आहे. होर्मुज जलडमरु मार्ग बंद केला आहे. या मार्गाने भारतातील ८० ते ९० टक्के गॅस आणला जातो. त्यात आता एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत.इतिहासात पहिल्यांदाच एलपीजी गॅसच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, भारताकडे १२ दिवस पुरेल इतकागॅस आहे. भारत सरकारने तेल कंपन्यांनाही निर्देश दिले आहेत. एलपीजी गॅसचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन ग्राहकांना त्रास होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.