Gas Cylinder Latest Price Saam Tv
बिझनेस

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Gas Cylinder Latest Price : महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री तर लावलीच आहे. त्याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीने सर्व बजेटच बिघडवून टाकलं आहे.

Namdeo Kumbhar

lpg cylinder price : दिवाळी, दसऱ्याआधीच सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. मागील सहा महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली अन् कोलकातासह प्रमुख शहरात १९ किलो वजनाचा सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली. दरम्यान, घरगुती १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती गॅसची किंमत ८५३ रूपये इतकी आहे.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५.५० रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून नवीन दर लागू करण्यात आले. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९५.५० रूपये इतकी झाली आहे. आर्थिक वर्षात पहिल्यांदाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. याधी लागोपाठ सहा महिने गॅस सिलिंडरचे दर सहा महिने स्वस्त झाले होते.

चालू आर्थिक वर्षामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. सहा महिन्यापासून व्यावसायिक दरात कपात झाली होती. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५४७ रूपये इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये १७००.५० रूपये, चेन्नईमध्ये १७५४.५० रूपये तर राजधानी दिल्लीमध्ये १५८० रूपये इतकी किंमत झाली आहे. १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल अन् रेस्टोरेंट्समध्ये होतो. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे खाण्या-पिण्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घरात करा 'ही' 5 कामं; वास्तु मान्यतेनुसार वातावरण राहील प्रसन्न

Horoscope Rahu-Ketu : चांदीच चांदी होणार! नशीब पलटणार, या 3 राशींचं नशीब अचानक चमकणार

LDL cholesterol: कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असूनही हृदय धोक्यातच; तुमचं LDL-C लक्ष्य किती असायला हवं?

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात गणेश विसर्जनाला सुरुवात

Lalbaugh Raja : लालबागचा राजाच्या मंडपाजवळ मोठी दुर्घटना! ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT