gas cylinder  Saam tv
बिझनेस

LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

Domestic gas cylinder price in Mumbai Pune : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल झाला का? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील आजचे गॅस सिलिंडरचे ताजे दर आणि भविष्यातील संभाव्य दरवाढ जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

LPG Price Today : मागील १० दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ४ वेळा वाढ झाली आहे, तर आज सकाळी सीएनजीच्या (CNG) किंमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास १ हजार रूपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. ताटातील जेवणापासून ते प्रवास आणि इतर सर्वच ठिकाणी किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे (Domestic LPG Cylinder) दरही वाढतील, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली का? याबाबत जाणून घेऊयात.. (Domestic gas cylinder rate)

सरकारी तेल कंपन्यांनी मागील १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केली. मात्र, एलपीजी सिलेंडरच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोमवारीच तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रति लिटर ११० रूपयांवर पोहचले आहेत.

घरगुती सिलेंडरचा सध्याचा दर काय आहे?

राजधानी दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरची किंमत ₹९१३ इतकी आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत ₹९१२.५० आणि कोलकातामध्ये ₹९३९ इतकी किंमत आहे. चेन्नईमध्ये आज घरगुती सिलेंडरची किंमत ₹९२८.५० आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय येत आहेच. पण तरीही अनेक दिवसांपासून सिलिंडरचे दर स्थिर आहेत. आखाती देशातील तणावामुळे भारतासारख्या अनेक देशांमध्ये इंधनाचे संकट तयार झाले आहे.

घरगुती गॅसच्या दरात वाढ होणार का?

इराण-इस्त्राइल-अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर याचा परिणाम जगावर पडला. अनेक देशांचा इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच क्रूड ऑइलच्या किंमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली. देशातील इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ४७ टक्क्यांची वाढ केली, मुंबईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३०२४ इतकी आहे.

दरम्यान, घरगुती सिलेंडरच्या दरात शेवटची वाढ ६० रुपयांची झाली होती. मात्र त्यानंतर दर स्थिर राहिले आहेत. आता हे दर किती काळ स्थिर राहतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत, किमती न वाढवल्यामुळे कंपन्यांना प्रचंड तोटा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० ते १०० रूपयांची वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली यादी कधी जाहीर होणार? तारीख आली समोर

Pravin Tarde-Deool Band 2 : स्वामींचे तेजस्वी रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध; 'देऊळ बंद २' सुसाट, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची ५ व्या दिवशी कमाई किती?

Onion: मातीमोल कांदा, खिशाला भुर्दंड; कांदा अजून किती दिवस शेतकऱ्याला रडवणार?

Shocking : हृदयद्रावक! आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ३ नातींवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT