LPG Cylindercha Bhav : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चिंता वाटू लागली आहे. नवीन महिना सुरु झाला की, अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होताना दिसून येतो.
अशातच १ जुलै म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलिंडरची (Cylinder) किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत (Price) 1773 रुपये आहे.
याशिवाय देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणार्या मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपये कायम आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत 1875.50 रुपये आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 1118.50 रुपयांना विकला जात आहे. तर व्यावसायिक रु.1937 ला विक्री होत आहे.
1. एलपीजीच्या किमती कधी बदलल्या?
गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी, त्याआधी गेल्या वर्षी ६ जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता तो 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.
2. एलपीजी सिलेंडरची किंमत कुठे तपासायची
एलपीजी सिलेंडरची किंमत तपासायची असेल तर इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com/prices-of-petroleum-products वर जाऊन तपासू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.